Ramayana Shurpanakha Rakul Preet Singh: सध्या संपूर्ण सिनेसृष्टीचं लक्ष लागलंय, 4000 कोटींच्या 'रामायण'कडे (Ramayana Movie). या आगामी सिनेमानं सर्वांचीच उत्सुकता ताणली आहे. तसेच, या सिनेमाच्या जोरदार चर्चाही रंगल्या आहेत. या सिनेमातले कलाकार, त्यांनी साकारलेली पात्रं आणि कथानकातील महत्त्वाच्या भूमिकांविषयी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. विशेषतः शूर्पणखाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं असून, ही भूमिका अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Actress Rakul Preet Singh) साकारणार असल्याची चर्चा आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रकुल प्रीत सिंहनं लूक टेस्टही दिल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी या भूमिकेसाठी प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिचं नाव चर्चेत होतं. मात्र, अखेरीस रकुलची निवड झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
'रामायण'च्या (Ramayana) कथेत शूर्पणखा ही अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा मानली जाते. तिच्यामुळेच प्रभू राम आणि रावण यांच्यात संघर्ष निर्माण होतो आणि संपूर्ण कथानकाला निर्णायक वळण मिळतं. अनेक कथांमध्ये शूर्पणखेला रागीट आणि सूड घेणारी स्त्री म्हणून दाखवलं गेलं असलं, तरी काही कथांमध्ये ती आत्मविश्वासपूर्ण आणि भावनिक व्यक्तिमत्त्व असलेली महिला म्हणूनही समोर येते. त्यामुळे सिनेमात या भूमिकेला अधिक सखोल आणि वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
बॉलिवूडच्या टॉप हिरोइन्सपैकी एक (Bollywood Top Actress)
रकुल प्रीत सिंह ही सध्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य, फिटनेस आणि ग्लॅमरस अंदाजामुळे ती कायम चर्चेत असते. तिनं दक्षिणेकडील अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केल्यानंतर हिंदी सिनेसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रकुल प्रीत सिंहची संपत्ती कोट्यवधी रुपयांमध्ये असून, एका सिनेमासाठी ती मोठं मानधन आकारते. त्यामुळे तिची गणना इंडस्ट्रीतील महागड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.
वैयक्तिक आयुष्यामुळेही रकुल प्रीत सिंह अनेकदा चर्चेत असते. तिनं निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी याच्याशी लग्न केलं आहे. जॅकीनं सुरुवातीला अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. मात्र, अभिनय क्षेत्रात त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर त्यानं निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आणि अनेक सिनेमे आणि प्रोजेक्ट्सशी स्वतःला जोडून घेतलं. सध्या हे दोघंही मनोरंजनविश्वातील चर्चित जोडप्यांपैकी एक मानले जातात.
400 कोटींची फिल्म आपटली अन् मोठी किंमत चुकवावी लागली (Rakul Preet Singh Jackky Bhagnani)
रकुल प्रीत सिंहचा नवरा निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी याच्या निर्मिती संस्थेचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा मोठ्या बजेटचा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच खूप चर्चेत होता. तब्बल 400 कोटी रुपये खर्च करून हा सिनेमा तयार करण्यात आलेला. या सिनेमाकडून बॉक्स ऑफिसवर मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
मोठ्या स्टारकास्ट आणि भव्य अॅक्शन असूनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होण्यास अपयशी ठरला. त्यामुळे निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याची चर्चा रंगलेली. या अपयशामुळे मनोरंजनविश्वातही मोठ्या बजेटच्या सिनेमांच्या यश-अपयशाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP माझाच्या बातम्या LIVE...
