Ram Mandir Inauguration : अयोध्येत आज (दि.22) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा सोहळा दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी बॉलिवूडचे (Bollywod)अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित होते. अभिनेत्री कंगणा राणावत या सोहळ्यासाठी दोन दिवसपूर्वीचं हजर राहिली होती. दरम्यान राम मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर कंगणा सेलिब्रेशन मोडमध्ये आहे. तिने जोरदार सेलिब्रेशन करत फुलं वाहिली आहेत.
कंगणाने घेतली बागेश्वर बाबाची भेट
कंगणा रणौतने अयोध्येत बागेश्वर बाबाचीही भेट घेतली. बागेश्वर बाबाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. कंगणाने बागेश्वर बाबा सोबतचे फोटो शेअर केले. कंगणा बागेश्वर बाबा माझ्या लहान भावाप्रमाणे आहेत, असे म्हणाली आहे. मला वयाने लहान असणारा गुरु भेटला असल्याचेही कंगणा म्हणाली.
कंगणाने इन्स्टा स्टोरीमध्ये काय लिहिले?
कंगणाने अयोध्येतील फोटो शेअर करताना लिहिले की, "पहिल्यांदा वयाने लहान असलेला गुरु भेटला. माझ्यापेक्षा जवळपास 10 वर्षांनी लहान आहे. मनाला वाटले तर लहान भावाप्रमाणे मिठू मारु. नंतर लक्षात आले की, कोणी वयाने मोठा आहे, म्हणून गुरु होत नाही. तर कामामुळे गुरु होतो. गुरुच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला, जय बजरंगबली"
'अयोध्येचा राजा मोठ्या वनवासानंतर घरी परतणार'
रामभद्राचार्य यांची भेट घेतल्यानंतर कंगणा राणावतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. कंगणा म्हणाली, "आज परमपूज्य श्री राम भद्राचार्य यांची भेट झाली. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्याद्वारे शास्त्रवत सामुहिक हनुमान यज्ञाचे देखील आयोजित करण्यात आले होते. त्यात मी देखील सहभागी झाले. अयोध्येत रामाचे आगमन होणार आहे. त्यामुळे वातावरण राममय झाले आहे. उद्या अयोध्येचा राजा मोठ्या वनवासानंतर घरी परतणार आहे", असे कंगणा राणावत म्हणाली आहे.
रामाच्या मूर्तीचे कंगणाकडून कौतुक
अभिनेत्री कंगणा राणावत (Kangana Ranaut) हीने रामाच्या मूर्तीचे फोटो शेअर करत मूर्तीकारांचे कौतुक केले आहे. कंगणाने कल्पना केली होती तशीच तिला मोहित करणारी रामाची मूर्ती आहे. कंगणाने श्री रामाचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केले होते. कंगणाने मूर्तीचे फोटो शेअर करताना लिहिले की, "मला वाटत होतं रामाची मूर्ती मला तरुणाप्रमाणे वाटेल. मात्र, मी रामाची कल्पना करत होते, त्याच पद्धतीची मूर्ती साकारण्यात आली आहे"
इतर महत्वाच्या बातम्या