Ramleela Movie 12 years: संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गोलियों की रासलीला राम-लीला या चित्रपटाला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. रंगांच्या थाटामाटात, कलात्मक भव्यतेत आणि भावनांमध्ये न्हालेल्या या चित्रपटात सर्वाधिक उठून दिसलेलं नाव म्हणजे राम. रणवीर सिंगने (Ranvir Singh) जिवंत केलेलं हे पात्र केवळ एक भूमिका नव्हती; ते त्याच्या कारकिर्दीतील निर्णायक टप्पा ठरलं. उत्कट प्रेम, बेधडक स्वभाव आणि आगीसारखी ऊर्जा हे सगळं एकत्र येऊन रणवीरचा ‘राम’ आजही अविस्मरणीय बनतो.
1. करिअरला नवाच वेग देणारा टप्पा
राम-लीला रणवीर सिंगच्या करिअरमधील पहिलं मोठं ट्रान्सफॉर्मेशन होतं. घडवलेलं शरीर, प्रखर स्क्रीन प्रेझेन्स आणि पात्रात पूर्णपणे झोकून देण्याची त्याची तयारी या सर्वांनी ‘राम’ला एक वेगळंच आकर्षण दिलं. हा रोल रणवीरला एका नवं रूपात ओळख देणारा ठरला.
2. प्रेमकथेला दिलेलं आगळंवेगळं रूप
रणवीरचा ‘राम’ हा एक असा नायक होता जो प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावतो. दीपिका पदुकोणसोबतची त्याची केमिस्ट्री जबरदस्त होती. इतकी खरी, इतकी प्रभावी की त्यांच्या प्रत्येक सीनेवर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे प्रत्येक कटाक्ष, भांडण आणि आलिंगन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे होते.
3. भन्साळींच्या सिनेमॅटिक कॅनव्हासवर रणवीरची जादू
भन्साळींचं दिग्दर्शन, त्यांची भव्य फ्रेम्स, भावनांचा वादळ या सगळ्यात रणवीरने स्वतःचा ठसा उमटवला. प्रकाश, संगीत, गोंधळ आणि रंगांच्या भरगच्च वातावरणात त्याने ‘राम’च्या रूपाने एक वेगळंच तेज दाखवलं.
4. ‘राम’ बनला पॉप-कल्चरचा सिंबॉल
“ततड तडड” किंवा “अंग लगा दे” असो रामचा स्वॅग आणि स्टाईल काही क्षणांत लोकांमध्ये घर करून गेली. त्याचा त्याचा लूक, संवाद आणि अदा आजही चाहत्यांमध्ये तशीच लोकप्रिय आहेत.
5. रणवीरच्या नव्या अध्यायाची सुरुवात
राम-लीला हा चित्रपट फक्त एक प्रेमकथा नव्हता; तो रणवीरच्या मोठ्या प्रवासाची सुरुवात होती. या चित्रपटानंतर भन्साळीसोबत त्याची जुळलेली जोडी अजून मोठी कामगिरी घेऊन आली बाजीराव मस्तानी, पद्मावत, गली बॉय, रॉकी और रानी सारख्या दमदार भूमिकांचा पाया याच चित्रपटाने घातला.