Ram Kapoors on Fathers Death in Lock Upp 2: 'लॉक अप 2' (Lock Upp 2) या रिअॅलिटी शोमध्ये राम कपूर (Ram Kapoor) आणि आकांक्षा चमोलाची (Akanksha Chamola) प्रचंड चर्चा होत आहे. राम कपूर आणि आकांक्षा चमोलाने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बरेच खुलासे केले आहेत. यामुळे दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, 'लॉक अप 2' (Fathers Death) मधील स्पर्धकांमधील ड्रामा सस्पेन्स हा वाढत चालला हे.  एकीकडे  हर्षद चोप्रा आणि शिवांगी जोशी यांच्या केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर, दुसरीकडे आकांक्षा चमोला, श्रेया आणि राम कपूर आपल्या गेम प्लानमुळे चर्चेत आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये स्पर्धकांना आपल्या आयुष्याषी निगडीत सिक्रेट रिव्हिल करण्यास सांगितलं होतं. राम कपूरचे सिक्रेट ऐकताच अनेकांना मोठा धक्का बसला. 

Continues below advertisement

राम कपूरने 'लॉक अप 2'मध्ये सांगितलं होतं की, त्यानं वडिलांच्या मृत्यूचं प्लानिंग केलं होतं.  त्यांच्या वडिलांना मृत्यूला कवटाळायचं होतं. पण यासाठी राम कपूरने त्यांची मदत करावी, अशी त्यांची इच्छा होती.  अभिनेत्याने सांगितलं की, त्याच्या वडिलांना पॅनक्रियाचा कर्करोग झाला होता. 73 व्या वर्षी तो कॅन्सर पुन्हा बळावला.  वेदनादायी ट्रिटमेंट घेतल्यानंतर ते बरे झाले होते.  पण त्यांना पुन्हा या वयात ट्रिटमेंट करायचे नव्हते. ते यासाठी तयार नव्हते, असं राम कपूरने सांगितलं.

राम कपूरचे वडील आपले आयुष्य आनंदात जगत होते, आणि त्यांना शांतपणे या जगाचा निरोप घ्यायचा होता.   'लॉक अप 2'चा स्पर्धक राम कपूरने मुलाखतीत सांगितलं की, 'कोव्हिडदरम्यान, त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला होता.   त्यांनी गौतमीला फोन केला होता आणि माझ्याशी बोलायचं आहे, असं सांगितलं. जेव्हा  आम्ही दोघं बोलत होतो, तेव्हा आमची प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली.  त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, त्यांना या आजारपणाशी अजून लढायचे नाही', असं राम कपूर म्हणाला. 

Continues below advertisement

राम कपूरने वडिलांबाबतीत केला धक्कादायक खुलासा (Ram Kapoor on fathers Death)

'त्यांना हे जग सोडायचे होते. पण असं करताना त्यांना खूप भीती वाटत होती' असं राम कपूर म्हणाला.  राम कपूरच्या वडिलांना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे घरातील इतर सदस्यांना, कुणालाही कळू द्यायचे नव्हते. एकटेपणाने हे पाऊल उचलण्यास ते खूप घाबरत होते. त्यांना फक्त त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राम हवा होता.   राम कपूर म्हणाला, 'तू माझ्या मृत्यूमध्ये मला मदत करु शकतो का? असं मला त्यांनी थेट विचारलं.   मला त्यांनी सांगितलं होतं की, जर तू मला मदत केली नाहीस, तर मी स्व:त एकटं सगळं करेन. त्यांनी माझ्यासमोर इतर कोणताही पर्याय सोडला नव्हता', असं राम कपूर म्हणाला. 

वडिलांच्या शेवटच्या आठवणींना उजाळा देत राम कपूर म्हणाला, 'कोरोना काळात वडील आयसीयूमध्ये उपचार घेत होते. पण असं काही नव्हतं. माझा हात पकडून त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या कारणामुळे माझी आई आणि बहीण माझ्याशी बोलत नाही', असं राम कपूर म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, नाटक सुरू असतानाच मंचावर कोसळला; जगाचा निरोप घेताना 5 जणांना दिलं जीवनदान