Ram Gopal Varma On Raja Shivaji: राजा शिवाजीने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज एंट्री घेताच सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. रितेश देशमुख अभिनीत आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या यशावर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’नंतर आता त्यांनी ‘राजा शिवाजी’चेही भरभरून कौतुक केले आहे. (Raja Shivaji)
राम गोपाल वर्मा यांचे कौतुक
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या X हँडलवरून ट्विट करत चित्रपटाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी लिहिलं की, “तुमचा ‘राजा शिवाजी’ ज्या प्रकारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय आणि विक्रम मोडत आहे, त्याबद्दल जेनेलिया डिसूझा यांचे अभिनंदन. रितेश देशमुख अभिनेता आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिकांमध्ये प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. खरंच असं वाटतंय जणू शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म झाला आहे.”
चित्रपटाची स्टारकास्ट ‘राजा शिवाजी’ची निर्मिती जेनेलिया डिसूजा यांनी केली असून, सहनिर्मिती ज्योती देशपांडे यांनी केली आहे. रितेश देशमुख यांनी मुख्य भूमिका साकारत दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. या चित्रपटात संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन , भाग्यश्री पटवर्धन आणि फरदीन खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच सलमान खान यांचा कॅमिओही चित्रपटात पाहायला मिळतो.
बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’ची कमाल
राजा शिवाजी हा चित्रपट सर्वात मोठा मराठी ओपनर ठरला आहे. हिंदी आणि मराठी भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केली आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘राजा शिवाजी’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल ₹11.35 कोटींची कमाई केली. यामध्ये केवळ मराठी व्हर्जनमधूनच सुमारे ₹8 कोटी नेट कलेक्शन झालं. मराठी चित्रपटासाठी पहिल्या दिवशी एवढी कमाई ऐतिहासिक मानली जात आहे. फक्त 1,941 शोमधून चित्रपटाने 68% एवढी मजबूत ऑक्युपन्सी नोंदवत प्रेक्षकांची मोठी गर्दी खेचली.
हेही वाचा:
