'Ram Dhun'teaser : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंकज त्रिपाठीने (Pankaj Tripathi) अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. दरम्यान, आज (दि.3) ‘मैं अटल हूं’मधील राम धून या गाण्याचा टीजर लाँच करण्यात आलाय. संपूर्ण गाणे उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम धून हे गाण गायक कैलाश खैर यांनी गायलंय. कैलाश खैर यांनी गायलेला या गाण्याचा टीजर पंकज त्रिपाठीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलाय. 


गाण्याचा टीजर शेअर करताना पंकज त्रिपाठीने लिहिले की,"Har dil mein uthegi goonj, jab bajegi #RamDhun Teaser out now. Song releasing tomorrow #MainATALHoon in cinemas 19th January 2024 (The echo will resonate in every heart, when the #RamDhun plays. Teaser out now. Song releasing tomorrow. #MainATALHoon in cinemas on 19th January 2024) (sic)."



'मैं हू अटल'चा ट्रेलर यापूर्वीच झालाय प्रदर्शित


मै हू अटल (Main Atal Hoon) या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीचं प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून राजकीय कारकिर्द आणि भारतात सत्तापालट करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान असे सर्व प्रसंग सिनेमातून दाखवण्यात येणार आहेत. वाजपेयी यांच्या आयुष्यातून वेगवेगळे पैलू आपल्याला सिनेमातून पाहायला मिळणार आहेत. 


अटल बिहारी वाजपेयी यांचं आयुष्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी 


मैं हू अटलमध्ये वाजपेयी यांची भूमिका साकारणारा पंकज त्रिपाठी म्हणाला, "सिनेमापेक्षा मला अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणे, ही माझ्यासाठी ह्रदयस्पर्शी  गोष्ट होती. अटल बिहारी वाजपेयी यांचं आयुष्य संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. मी आशा करतो की, वाजपेयी यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी केलेला प्रयत्न तुम्हा सर्वांना आवडेल." 


मराठमोळ्या रवी जाधव यांनी केलंय दिग्दर्शन 


मैं हू अटल या सिनेमाचे दिग्दर्शन रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी केलंय. रवी जाधव याबाबत बोलताना म्हणााले, मी लहानपणापासून अटल बिहारी वाजपेयी यांना फॉलो करत आलो आहे. त्यानी देशासाठी दिलेले योगदान रोज पाहिलंय. मी भाग्यवान आहे की, मला वाजपेयी यांच्यासारख्या महान नेत्याची जीवनावरिल आधारित सिनेमाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. 


 


 







इतर महत्वाच्या बातम्या 


Telly Masala : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत शालिनी शिर्केपाटीलची एन्ट्री ते आमिरच्या लेकीचं लग्न; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या