Peddi Box Office Collection: राम चरण (Ram Charan) आणि जान्हवी कपूर (Janhavi kapoor) यांचा 'पेद्दी' (Peddi) सिनेमानं अवघ्या 3 दिवसांत बॉक्स ऑफिसवर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. या स्पॉर्ट्स ड्रामा (Entertainment) सिनेमाची प्रेक्षकांमध्ये जादू चालली. या सिनेमानं अवघ्या तीन दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तसेच, या सिनेमानं जगभरात 150 कोटींचा टप्पाही ओलांडला आहे.  शनिवारी या सिनेमानं दाक्षिणात्यसह इतर भागात दमदार कमाई केली. दरम्यान, या चित्रपटाने  शनिवारी नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

'पेद्दी' सिनेमाचे तीन दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Ram Charan Peddi movie)

बुची बाबू सना दिग्दर्शित 'पेद्दी' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार,  या स्पॉर्ट्स ड्रामा सिनेमाने पेड प्रिव्ह्यूमध्ये 18.50 कोटींचे कलेक्शन केले आहे.  पहिल्या दिवशी या सिनेमानं 51 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर, दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 26.90 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. अवघ्या दोन दिवसांत या सिनेमानं जवळपास 95 कोटी रुपयांचे बिझनेस केला आहे.

दरम्यान, प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या सिनेमानं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार,  'पेद्दी' नं तिसऱ्या दिवशी रात्री 10: 30 पर्यंत 29 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  दरम्यान, या सिनेमाची भारतातील एकूण कमाई 125.40 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 

Continues below advertisement

तेलुगूमध्ये 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश (Peddi worldwide box office)

 

 

'पेद्दी' या सिनेमानं तेलुगू भाषेमध्येही चांगली कामगिरी करत आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, या सिनेमानं तेलुगूमध्ये 115.65 कोटी कमावले आहेत. हिंदी भाषेत 8.05 कोटी, कन्नडमध्ये 59 लाख तर, मल्याळममध्ये  16 लाख आणि तामिळमध्ये या सिनेमानं 95 लाख रुपयांचं बिझनेस केलं आहे.  लवकरच हा सिनेमा 150 कोटींचा टप्पा पार करेल, यात शंका नाही. या सिनेमात राम चरण मुख्य भूमिकेत असून,  अभिनेत्री जान्हवी कपूर हिची देखील मुख्य भूमिका आहे. तिच्या भूमिकेचंही विशेष कौतुक होत आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवरील 'तो' VIDEO व्हायरल; तेजश्री प्रधानची कमेंट चर्चेत, म्हणाली...