Rakhi Sawant On Donald Trump: आपल्या चित्र विचित्र वक्तव्यांमुळे कायम प्रसिद्धी झोतात राहणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आता पुन्हा एकदा अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे . अलीकडेच राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तिने केलेलं हे वक्तव्य सध्या व्हायरल झालं आहे . आपल्या आईचा निधनानंतर राखी सावंत दुबईला स्थलांतरित झाली होती .बऱ्याच दिवसांनी ती आता मुंबईत परतली आहे . ती 'पती पत्नी और पंगा' या शोच्या शूटिंग दरम्यान दिसली .तेव्हा पापाराझींशी तिने संवाद साधला . त्यावेळी 'माझ्या आईने जग सोडण्यापूर्वी एक चिठ्ठी सोडली, त्यात लिहलंय, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) तुझे खरे वडील आहेत' असं म्हणताना ती दिसतेय .
'डोनाल्ड ट्रम्प तुझे खरे वडील आहेत'
या व्हिडिओमध्ये ती एका कार्यक्रमानंतर आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना दिसते . काळ्या रंगाचे कपडे तिने घातलेत . पापाराझी तिला बघून धावत गेले त्यावेळी त्यांच्यासमोर नाचून सर्वांचे लक्ष तिने वेधून घेतले . नंतर या व्हिडिओमध्ये ती पापाराझींशी बोलताना दिसते . ती म्हणते, माझी आई आता जग सोडून गेली आहे .माझ्या आईने जग सोडण्यापूर्वी एक चिठ्ठी सोडली होती . त्यात लिहलंय, डोनाल्ड ट्रम्प तुझे खरे वडील आहेत . यावर पापाराझी म्हणतात, पण ते सध्या मोदीजींना त्रास देताना दिसत आहेत . यावर हात जोडून ' Thank you so much ' मेरे से पंगा ना लो असे नाटकी आवाजात बोलते . नंतर ' जा रही हूं बिग बॉस में और धमाका मचाऊंगी ' असे म्हणताना दिसतेय . माध्यमांशी बोलतानाची ही वक्तव्य सध्या वाऱ्यासारखी व्हायरल होत आहेत .या व्हिडिओवर अनेक लोक कमेंटही करत आहेत .
कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांचा धुमाकुळ
राखी सावंतच्या या व्हायरल कमेंटनंतर नेटकऱ्यानी कमेंट सेक्शनमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे . एकाने लिहिले, ' आते ही नोटंकी स्टार्ट कर दिया ' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, 'कुठला नशा करते.. मलाही गरज आहे " तर काही नेटकरांनी ' आपल्या आई विषयी असं बोलताना काहीतरी लाज वाटू दे ' अशा पद्धतीच्याही कमेंट केल्या आहेत .