Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: सध्या बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कंगना रनौत (Kangana Ranaut) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यासाठी कारण ठरलंय तिनं 'जेन-झीं'साठी केलेली पोस्ट आणि त्यांच्यासाठी वापरलेले आक्षेपार्ह्य शब्द. कंगना रनौतनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हिंदू तरुणींसाठीही काहीबाही बरळली आहे. गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश करणाऱ्या, ड्रग्ज-दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या असं म्हणत कंगनानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अशातच आता कंगनाच्या वक्तव्यानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) हिनं आता कंगनावर आक्षेपार्ह्य शब्दांची लाखोली वाहत, हल्लाबोल केलाय.
राखी सावंत (Bollywood Actress) कंगनाला म्हणाली की, देशातील विद्यार्थी आणि मुलींकडे बोट करण्यापूर्वी तिनं आधी स्वतःचं कॅरेक्टर पाहावं. तसेच, कंगनानं हेसुद्धा पाहावं की, इंडस्ट्रीमध्ये इतक्या वर्षांत तिनं कुठे-कुठे तोंड काळं केलंय.
राखी सावंत एवढंच बोलून थांबली नाही, तर तिनं कंगनावर अत्यंत आक्षेपार्ह टीका केली आणि म्हटलं की, देशातील महिला, मुलं आणि मुलींविरुद्ध बोलण्याचा तिला कोणताही अधिकार नाही. तिनं पुढे असंही म्हटलंय की, जर कंगना रनौत तिची 'झेड' (Z) श्रेणीतील सुरक्षा व्यवस्था न घेता बाहेर फिरली, तर तिला या देशाची खरी ताकद समजेल. राखी सावंतनं कंगनावर टीका करतानाचा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
एक कानाखाली खाल्लेली ना एअरपोर्टवर...? : राखी सावंत (Rakhi Sawant On Kangana Ranaut)
राखी सावंत कंगनावर टीका करताना म्हणाली की, "ए कंगना... काय देऊन मिनिस्टर झालीस तू... अशी जर तू कुठेही बाहेर गेलीस ना कंगना, तर साधं कुत्रंही तुला मत देणार नाही... ऐक मी काय सांगतेय, आपल्या देशातल्या मुलींबाबत काय बरळतेयस तू, माझे विद्यार्थी आणि माझ्या मुलींबाबत? एक कानाखाली खाल्लेली ना एअरपोर्टवर...?"
तुला भिती नाही वाटत का गं? अजून कानफाडीत खायच्यात का? : राखी सावंत
राखी सावंत पुढे बोलताना म्हणाली की, "तुला भीती वाटत नाही का? तुला सगळीकडे मार खायचाय का? माझ्या देशातील मुलींबद्दल तू ही कसली बडबड करतेयस? तुला Z सिक्युरिटी देण्यात आलीय आणि तू त्या सिक्युरिटीचा आव आणत फिरतेस, हिंमत असेल तर एकट्यानं फिरून बघ. एकट्यानं फिर, मग तुला या देशाची, इथल्या तरुणांची आणि लोकांची खरी ताकद समजेल. तू पळून जाणारा माणूस आहेस. संसदेत तू एकटीच बसून ही कसली बडबड करतेयस?'
आधी स्वतःचं चारित्र्य बघ... : राखी सावंत
राखी सावंतनं कंगनावर पुन्हा एकदा कडाडून टीका करताना सुनावलं की, दुसऱ्या मुलींवर बोट उचलण्यापूर्वी आधी स्वतःच्या चारित्र्याकडे एकदा पाहा. ती म्हणाली, "तू देशातील मुलींबद्दल इतकं वाईट बोलतेयस? आधी स्वतःचं चारित्र्य तर बघ... बॉलिवूडमध्ये तू काय केलंयस, तू कोणाकोणासोबत राहिलीस आणि स्वतःची बदनामी करण्यात तू किती वर्षं घालवलीस, याकडे एकदा नजर टाक. स्वतःचं चारित्र्य तपासून बघ, घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड... घाणेरडी बाई! माझ्या देशातील मुलींविरुद्ध बोलायची तुझी हिंमत कशी झाली? तू स्वतःला समजतेस तरी कोण?"
महत्त्वाच्या इतर बातम्या :
