Rakhi Sawant On Donald Trump: बॉलिवूडची (Bollywood News) ड्रामेबाज, टीआरपी क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) या-ना त्या कारणानं चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती आणि तिचे नवनवे दावे, चर्चेचा विषय ठरत आहेत. अलिकडेच मुंबईला परतलेली राखी सावंत सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशातच आता राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून आता राखी सावंतनं 'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरातल्या तान्या मित्तलच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं बोलत आहेत. बिग बॉसमधली तान्या मित्तल दररोज नवनवे दावे करते, श्रीमंतीचा बडेजावपणा करते. तसंच राखी करत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्याबद्दल बोलत आहे. राखी म्हणतेय की, माझ्या डोनाल्ड पप्पांनी माझ्यासाठी बंगला बांधलाय...

Continues below advertisement

राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये राखी म्हणतेय की, "धन्यवाद... पप्पा डोनाल्ड ट्रम्प... माझे डोनाल्ड बाबा माझ्यासाठी सर्व काही करतात. त्यांनी अमेरिकेत माझ्यासाठी एक मोठा बंगला बांधलाय..." राखी बोलत असतानाच कुणीतरी मधे काहीतरी कमेंट करतं. तर राखी म्हणते, "बंगलोर नाही, तर एक बंगला..." 

"ट्रम्प पप्पांनी मला फेवरेट कार गिफ्ट केलीय..."

व्हिडीओमध्ये राखी सावंत पुढे म्हणाली की, "मी लंडनला जातेय. अमेरिकेला जातेय... पप्पा डोनाल्ड ट्रम्प यानी माझी फेवरेट कार दिली आहे. ट्रम्प माझे पप्पा आहे..." राखीच्या व्हिडीओवर युजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत आणि तान्या मित्तलचं नाव घेऊन टीका करत आहेत. अनेकजण असंही म्हणतात की, राखी या व्हिडीओद्वारे तान्या मित्तलला ट्रोल करतेय. एका युजरनं कमेंट केलीय की, "तान्या मित्तल प्रो" तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, "राखी ट्रम्प अमेरिकेच्या पुढच्या राष्ट्रपती..." आणखी एकानं लिहिलंय की, "ती तान्या मित्तलपासून इंस्पायर आहे..." 

बिग बॉस 19 मध्ये राखी सावंत घेणार एन्ट्री? 

राखी सावंत मुंबईत परतल्यापासून, पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ती यापूर्वी बिग बॉसच्या तीन सीझनमध्ये दिसली आहे आणि आता अशी चर्चा आहे की, निर्माते तिला एन्टरटेन्मेटचा तडका देण्यासाठी चौथ्या सीझनमध्ये परत आणू शकतात. राखी सावंत पहिल्यांदा बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये दिसलेली. त्यानंतर ती बिग बॉस सीझन 14 आणि नंतर बिग बॉस सीझन 15 मध्येही दिसलेली. अशातच आता राखी सावंत बिग बॉसच्या घरात जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Hindi Web Series Won 66 Awards 9 INDB Rating: 32 एपिसोड्स असलेली हिंदी वेब सीरिज, जिंकलेत 66 अवॉर्ड्स, IMDb रेटिंग 9; धमाकेदार सीन्स अन् डायलॉग्स