Rakhi Sawant One Sided Love Story Raqesh Bapat: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. ग्रँड फिनालेला काही दिवस उरले आहेत. सध्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. राखी सावंतला बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या कमी मतांमुळे ती एलिमिनेट झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच तिने राकेश बापटला व्होट करा, असं जनतेला आवाहन केलंय.   बिग बॉसच्या घरात असताना  राखी आणि राकेशमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती.  दरम्यान, शोमध्ये अनेकदा राखीने, 'राकेशवर माझं प्रेम आहे', असं म्हटलं आहे.  राखीने बऱ्याचदा आपल्या प्रेमाची कबुली दिली. आता घराबाहेर आल्यानंतरही राखी राकेश बापटबद्दल बोलताना दिसत आहे. राखी सध्या विविध माध्यमांना मुलाखती देत आहे. नुकतंच दिलेल्या मुलाखतीत  राखीने राकेशकडे मोठी आणि अजब मागणी केली आहे.  

Continues below advertisement

अलिकडेच महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणते,  'राकेश बापटसोबत आधी खूप  भांडले. तसंच असतं ना, आधी कपलमध्ये भांडणं होतात, नंतर प्रेम वाढतं. आम्ही रात्र - रात्रभर एकमेकांशी बोलायचो.  त्याच्यातील काही गोष्टी माझ्या ह्रदयाला स्पर्श करुन गेल्या', असं राखी सावंत म्हणाली. 'माझं राकेश बापटवर एकतर्फी प्रेम आहे. पण असुदे. जगात भरपूर लोक एकतर्फी प्रेम करतात, गरजेचं नाही ते पूर्ण झालंच पाहिजे. माझं स्वप्न पूर्ण नाही होणार आहे. पण स्वप्न बघायला हरकत काय? माझं स्वप्न  कधीही तुटू शकतं. किंवा पूर्णही होऊ शकतं. थोड़ा सा प्यार हुआ है थोड़ा है बाकी..हम तो दिल दे ही चुके बस तेरी हाँ है बाकि, बापट..', असं राखी म्हणाली.

राखीकडून एकतर्फी प्रेमाची कबूली (Rakhi Sawant interview about Raqesh Bapat love confession)

'राकेशबरोबर मला गाणं करायचं आहे. तुम बिन माझं जीवन काहीच नाहीये राकेश.  तुम बिन Iam Finished.. मला माहितीये माझं स्वप्न पूर्ण होणार नाही. पण एक मेसेज मी राकेशला देऊ इच्छिते..राकेश जरी नाही मिळाला तर मी मरणार नाही, मी जगणार आहे.  माझं मन आता कुणावरही नाही येणार.  मला  त्याचं प्रेम भेटणार आहे. नवरा म्हणून नाही तर, मित्र म्हणून नक्कीच मिळेल. राकेशचं कदाचित मन बदलू शकतं. तो आपल्या आई  आणि बहिणीला मनवू शकतो.  काहीही घडू शकतं. मी शांत आणि श्रीमंत आहे', असं राखी म्हणाली.

Continues below advertisement

'त्याचं आता वय 47 आहे. आता त्याला कुठे 16 वर्षांची मुलगी भेटणार आहे का? मी त्याच्यापेक्षा लहान आहे. आता 2-3 वर्ष आहेत अजून, मुल  होऊ शकतं.  नंतर वय निघून गेलं की अडचणी येतात. मी त्याला सांगितलं होतं की,  विकी डोनरसारखं, माझ्या बाळाच्या जन्मासाठी तू डोनर हो.  तुझं स्पर्म डोनेट कर. तुला लग्न नाही करायचं ठीक आहे.    पण मला मुल हवंय, तू बाबा हो. तेव्हा बिग बॉसच्या घरात राकेश खूप हसला',  असं राखी सावंत म्हणाली. 'मी त्याला खूप सूट देईन.  माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे. मी त्याच्यासाठी व्होट मागते', असंही राखी म्हणाली. टॉप 3 मध्ये कोणते स्पर्धक बाजी मारतील, यावर उत्तर देताना राखी म्हणते, 'राकेश, तन्वी आणि विशाल.. अनुश्री लवकर निघेल. अनुश्री शेवटपर्यंत राहणार नाही. लास्टमध्ये विशाल आणि तन्वी राहणार. मला बिग बॉस कळतं, असं राखी म्हणाली.