Riteish Deshmukh on rakhi sawant: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये अभिनेत्री राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून घरातील समीकरणं बदलत चालली होती. कॉमेडी आणि ड्रामाचा तडका आपल्याला या शोमधून पाहायला मिळत होता. परंतु, काही एपिसोडमधील राखीचं वागणं प्रेक्षकांना खटकत होतं. कधी बिग बॉसच्या घरात ओरडणं. तर कधी घरातील वस्तू खराब करणं, तोडफोड करणं, हे सुरुच होतं. आता राखीने बिग बॉसच्या घरात मोठी चूक केलीये. तिनं जेवणाची नासाडी केली. यामुळे भाऊच्या धक्क्यावर राखीला तिच्या कृत्याची शिक्षा मिळणार आहे. सध्या याचा प्रोमो कलर्स मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या प्रोमो व्हायरल होत असून, तिला नेमकी कोणती शिक्षा मिळणार? हे लवकरच उघड होईल. 

बिग बॉसच्या घरात राखीनं चांगलाच ड्रामा केला आहे.  एका एपिसोडमध्ये राखी किचनमध्ये भाजी तयार करत होती.  तर, दीपालीने चहा बनवायला ठेवला होता.  राखीनं यावेळी चूक केली.  तिनं  भाजीतील वांगं दीपालीने ठेवलेल्या चहामध्ये टाकलं.   यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्य राखीवर भयंकर चिडले. राखीशी भांडू लागले.  भांडणानंतर राखीनं भाजी फेकून दिली.  

यानंतर राखीनं मोठा ड्रामा केला.   भाजीमध्ये थुंकी पडत असल्याचं कारण पुढे केलं. हेच कारण देत तिनं भाजी फेकली असल्याचं सांगितलं. पण राखी सारवासारव करत आहे, घरातील स्पर्धकांना कळून चुकलं.   यावेळी राखी भाजीजवळ गेली. तसेच पश्चातापही व्यक्त केला.  पण राखीला शिक्षा मिळणार, हे वारंवार सदस्य म्हणत होते. राखी हे सगळं ऐकून चिडली, 'तुम्ही मला शिक्षा देणार, एवढी तुमच्यात इतकी हिंमत..' असं म्हणताना राखी दिसली.   

 

भाऊच्या धक्क्यावर राखीने केलेल्या कृत्याचा विषय निघाला.  रितेश देशमुखने राखीला अन्नाची नासाडी केल्याबद्दल चांगलंच झापलं.  यावेळी राखीला रितेश देशमुखने  शिक्षा दिली. ही शिक्षा एक दिवस किंवा एक आठवड्यापूरती नसणार असल्याचं रितेश देशमुख म्हणाला. राखीला देण्यात येणारी शिक्षा संपूर्ण सीझनसाठी असणार आहे, अशी माहिती रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर दिली.  याचा प्रोमोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

प्रोमोमध्ये रितेश देशमुख राखीला धारेधर धरत आणि म्हणतो, 'राखी तुम्हाला अन्नाची किंमत नाहीये. हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसत आहे. ही गोष्ट इथे खपवून घेतली जाणार नाहीये. तुम्हाला याची शिक्षा दिली जाणार. एक  दिवस नाही तर, संपूर्ण सीझनसाठी ही शिक्षा असणार आहे'. यावेळी राखी मान खाली घालून सर्व ऐकते.  राखीला नेमकी कोणती शिक्षा मिळणार  हे भाऊच्या धक्क्यावर उघड होईल.