Bigg Boss Marathi 6, Rakhi Sawant: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन (Bigg Boss Marathi 6) सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच फिनाले (Bigg Boss Marathi 6 Grand Finale) अगदी तोंडावर आला असतानाच आता बिग बॉसच्या घरात फार मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. एककीडे घराला टॉप सहा स्पर्धक मिळाले आहेत. तर, दुसरीकडे एका सदस्यानं घरातून एग्झिट घेतली आहे. संपूर्ण घराला आपल्या तालावर नाचवणारी आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकणारी, घरातली सर्वात चर्चेत असणाऱ्या स्पर्धकानं घराचा निरोप घेतला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये झळकलेली टीआरपी क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) घराबाहेर पडली आहे.
राखी सावंत एलिमिनेट (TRP Queen Rakhi Sawant Eliminated)
यंदाच्या सीझनचा शेवटचा भाऊचा धक्का काल (शनिवारी) पार पडला. त्यावेळी घरातील एक सदस्य घराबाहेर गेला. जिला टीआरपी क्वीन म्हणून ओळखलं जातं आणि जिनं घरात आल्यापासूनच सर्वांना आपल्या तालावल नाचवलं, ती राखी सावंत घराबाहेर गेली. खरं तर, या आठवड्यात राखी सावंतसोबत विशाल कोटियन, राकेश बापट, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. तर, रेवा कौरासे ही कॅप्टन असल्यामुळे सेफ होती, तर तन्वी कोलतेनं 'तिकीट टू फिनाले' जिंकल्यामुळे तीसुद्धा सेफ होती. अशातच फिनालेच्या अगदी जवळ येऊन राखी सावंतचा 'बिग बॉस मराठी'चा प्रवास संपला.
राखीची दिपाली सय्यदवर खालच्या पातळीची टिका (Bigg Boss Marathi 6, Rakhi Sawant)
'बिग बॉस मराठी'च्या घरात गेल्यापासूनच राखी सावंत काही ना काही करुन घरात धुमाकूळ घालत होती. राखीनं आपल्या कट कारस्थानांनी घरातील सर्व सदस्यांच्या नाकी नऊ आणले होते. कितीही कोणतीही भांडलं, किंवा कोणी काहीही केलं तरीसुद्धा राखी तेच करायची, जे तिला वाटायचं. गेल्या आठवड्यात तर राखीनं मर्यादाच ओलांडलेली. भांडणात राखी थेट दिपाली सय्यदच्या वैयक्तिक आयुष्यावर टिका करण्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे घरात तणाव वाढल्याचं पाहायला मिळालेलं. भाऊच्या धक्क्यावरही रितेश देशमुखनं राखीला चांगलंच झाडलं होतं. यामुळेच राखीला घरातून एलिमिनेट केल्याचं बोललं जातंय. टीआरपी क्वीन घरातून बाहेर पडल्यानंतर आता बिग बॉसच्या घरात काय बदल होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
