Rakhi emotional breakdown: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या आठवड्यात प्रसिद्ध गायिका प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. आता नवव्या आठवड्यात एकूण 7 स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. नवव्या आठवड्यात कोण एलिमिनेट होणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. अलिकडेच राखी आणि दीपाली यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. याचा प्रोमो कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. दीपाली राखीसोबत बोलणं टाळते. ती न बोलण्याचा निर्णय घेते. राखी दीपालीला समजवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, बिग बॉसच्या घरात काहीतरी वेगळंच शिजत असल्याचं पाहायला मिळत आहे. राखी राकेशच्या प्रेमात अकंठ बुडाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या घरात राखीला राकेश आवडत असल्याचं एकंदरीत चित्र दिसत आहे. एका एपिसोडमध्ये राकेश रेवासोबत बोलतो, तरीही राखी संतापते. तसेच तिला रडू कोसळतं. यावेळी राखी राकेशला, 'तुला काहीच वाटत नाही का?', असं विचारते. त्यावर राकेश, 'काहीच वाटत नाही', असं उत्तर देतो. राखी प्रचंड उदास होते. तन्वी राकेशला समजावण्याचा प्रयत्न करते.
दुसऱ्यादिवशी राकेश हा दीपाली आणि तन्वीसोबत बोलत असतो. यावेळी तिघांमध्ये राखीचा विषय निघतो. तेव्हा राकेश, 'मला राखीला हर्ट करायचं नाही', असं म्हणतो. यानंतर राखी आणि दीपालीमध्ये जोरदार भांडण होते. राखीचा पारा चढतो. ती घरात जोरजोरात बोलू लागते. यानंतर राखी आणि सागरमध्ये शाब्दिक वाद होतो. सागर, 'तू आमच्याशिवाय काहीच नाही आहे' असं राखीला म्हणतो. तेव्हा राखी सागरला 'मुडद्या' असं म्हणते. याचा प्रोमोही कलर्स मराठीने शेअर केला आहे. दोघांच्या भांडणात बिग बॉसच्या घरातील वातावरण बिघडतं. यावेळी बिग बॉसच्या घरात राखीचा नवा ड्रामा पाहायला मिळतो.
राकेश राखीला समजवण्याचा प्रयत्न करतो. राखी राकेशला, 'मला तुझ्यासोबत मैत्री ठेवायची नाही', असं म्हणते. त्यावर राकेश हो असं उत्तर देतो. दोघांमधील केमिस्ट्री नेमकी कुठपर्यंत पुढे जाते? की राखी आणि राकेशमध्ये फक्त मैत्री राहते? हे लवकरच समोर येईल. सध्या बिग बॉसमधील राखी आणि राकेशचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
