Raju Srivastav Death : आपल्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसविणाऱ्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी आज जगाचा निरोप घेतला. राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी कार्डिएक अरेस्ट आल्याने त्यांच्यावर AIMS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 


राजू श्रीवास्तव यांची शेवटची पोस्ट 


राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी कानपूर येथे झाला. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. राजू श्रीवास्तव यांनी काही नेत्यांची बैठक घेण्यासाठी दिल्लीत मुक्काम केल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी ते हॉटेलच्या जिममध्ये वर्कआऊट करत असताना ते खाली पडले आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.






जेव्हा जेव्हा राजू श्रीवास्तव कॅमेऱ्यासमोर यायचे तेव्हा लोकांना हसवायचे. जातानादेखील त्यांनी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य सोडून गेले. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या व्हिडीओमध्ये ते लोकांना खळखळून हसवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये ते लोकांना अगदी मजेदार पद्धतीने कोरोना कॉलर ट्यूनची आठवण करून देताना दिसत आहेत. या व्हिडीओत राजू श्रीवास्तव थोडेसे हसले आणि लोकांना उद्देशून म्हणाले, कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळेच आता सावध राहण्याची गरज आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी वेगवेगळ्या अभिनेत्यांची कोरोना कॉलर ट्यूनच्या संदर्भात त्यांच्या आवाजाची मिमिक्री केली आहे. हा व्हिडीओही त्यांच्या इतर व्हिडीओ इतकाच मनोरंजक आहे. 


कानपूर शहराचे नाव उंचावले 


राजू श्रीवास्तव मनोरंज विश्वातील अशा ताऱ्यांपैकी एक होते ज्यांनी कानपूरसारख्या शहराचे नाव नेहमीच उंचावले. कानपूरमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने कॉमेडीयन म्हणून आपली ओळख निर्माण केली त्याबद्दल आपल्या सर्वांनाच त्यांचा आदर आहे. राजू श्रीवास्तव यांचे लहानपणापासूनच कॉमेडियन बनण्याचे स्वप्न होते. कॉमेडीशिवाय त्यांनी बिग बॉस, नच बलिये यांसारख्या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून देखील त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 


महत्वाच्या बातम्या : 


Raju Srivastav Death :  कॉमेडी किंगनं घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास