एक्स्प्लोर

Rajpal Yadav Wife Radha Yadav Reaction: राजपाल यादवनं तिहारमध्ये सरेंडर केल्यानंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, 'बॉलिवूड...'

Rajpal Yadav Wife Radha Yadav Reaction: राजपाल यादवची पत्नी राधा यादव हिनं बॉलिवूड इंडस्ट्रीच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेक लोक पतीच्या पाठीशी उभं राहून मदतीसाठी पुढे आल्याचं तिनं सांगितलं.

Rajpal Yadav Wife Radha Yadav Reaction: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या चेक बाउन्स प्रकरणात (Check Bounce Case) अडचणीत सापडला आहे. अभिनेत्यानं दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) आदेशानंतर तिहार तुरुंगात (Tihar Jail) सरेंडर केलं. त्यावेळी अभिनेत्यानं दिलेल्या प्रतिक्रियेनं सारेच भारावले. सोनू सूदनं सर्वात आधी अडचणीत सापडलेल्या राजपाल यादवसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यानंतर इंडस्ट्रीतले अनेकजण राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढे सरसावले. अशातच आता या सर्व प्रकरणावर राजपाल यादवच्या पत्नीनं आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

राजपाल यादवची पत्नी राधा यादव हिनं बॉलिवूड इंडस्ट्रीच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेक लोक पतीच्या पाठीशी उभं राहून मदतीसाठी पुढे आल्याचं तिनं सांगितलं. राधा यादवनं बुधवारी पीटीआयला माहिती देताना सांगितलं की, "सर्वांनी त्यांना पाठिंबा दिलाय. इंडस्ट्रीनं खूप पाठिंबा दिलाय. मदतीसाठी पुढे येणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार..." चेक बाऊन्स प्रकरणातील थकबाकी न भरल्यानं तिहार तुरुंगात राजपाल यादवनं आत्मसमर्पण केलं, तेव्हा राधा यादवचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

प्रकरण नेमकं काय?

राजपाल यादवचं चेक बाउन्स प्रकरण 2010 पासूनच सुरू झालेलं. त्यावेळी अभिनेता राजपाल यादवनं आपला सिनेमा 'अता पता लापता'साठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमधून 5 कोटींचं कर्ज घेतलं होतं. फिल्म बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाली, ज्यामुळे राजपाल यादवला मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला आणि कर्ज फेडण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागलेला. 

राजपाल यादवला कोर्टाचे सरेंडर करण्याचे निर्देश 

या काळात, राजपाल यादवनं त्याचं कर्ज फेडण्यात यश मिळवलं, ज्यामध्ये 2025 मध्ये भरलेले 7.5 दशलक्ष रुपये समाविष्ट होते. तथापि, वारंवार विलंब आणि मुदत चुकवल्यामुळे न्यायालयानं त्याच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, कारण त्यांनी प्रकरण सोडवण्यात 'गांभीर्याचा अभाव' असल्याचं सांगितलं. 4 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांनी पैशाची व्यवस्था करण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ देण्याची अभिनेत्याची अंतिम विनंती फेटाळून लावली. प्रसिद्धीची पर्वा न करता वारंवार उदारता दाखवता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आणि राजपाल यादवला विलंब न करता आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: 'मी काय करावं? माझ्याकडे पैसेच नाहीत...', तिहार तुरुंगात सरेंडर केलेला राजपाल यादव भावूक; अभिनेत्याच्या अडचणी संपेचना

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
Bigg Boss Marathi 6: शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
Dhurandhar 2: धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Embed widget