Rajpal Yadav Viral Video: 'मी पैसे घेतलेच नव्हते, त्यांनी त्यांच्या नातवाला हिरो बनवण्यासाठी...'; जेलमध्ये असलेल्या राजपाल यादवचा VIDEO व्हायरल
Rajpal Yadav Viral Video: अभिनेता राजपाल यादवचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो चेक बाउन्स प्रकरणावर स्पष्टपणे बोललाय.

Rajpal Yadav Viral Video: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता राजपाल यादवनं (Rajpal Yadav) चेक बाउन्स प्रकरणात (Cheque Bounce Case) तिहार तुरुंगात (Tihar Jail) सरेंडर केलं आहे. एकीकडे अभिनेता तुरुंगात आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडकरांनी राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. राजपाल यादव म्हणजे, बॉलिवूडमधला गुणी अभिनेता. त्यानं आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. सध्या अभिनेता तिहार तुरुंगात आहे. अशातच सध्या त्याचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो चेक बाउन्स प्रकरणावर स्पष्टपणे बोललाय. व्हिडीओमध्ये त्यानं सिनेमा करण्यासाठी पैसे घ्यायला स्पष्ट नका दिलाय. त्यासोबतच सर्वच्या सर्व आरोप निराधार असल्याचंही सांगितलं आहे.
मी पैसे घेतले नाहीत... : राजपाल यादव
लल्लनटॉपला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत बोलताना राजपाल यादवला विचारलेलं की, तुम्ही फिल्म तयार करण्यासाठी बिझनेसमन माधव गोपाळ अग्रवार यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतलेत? यावर राजपाल यादव म्हणाला की, "मी पैसे घेतलेच नव्हते... तर त्यानी फायनांसर म्हणून स्वतः इनवेस्ट केलेले... त्यांना त्यांच्या नातवाला हिरो बनवायचं होतं..."
'अता पता लापता' सिनेमाचे दिग्दर्शक होता राजपाल यादव?
मुलाखतीत राजपाल यादव यांना विचारण्यात आलं की, 'अता पता लापता'चे दिग्दर्शक तुम्हीच होता का? यावर बोलताना राजपाल यादव म्हणाले की, "मी 'अता पता लापता'चा दिग्दर्शक नाही... ना कधी असेन आणि ना राहील... मी अभिनेता आहे... कधीकधी 100 सामने खेळायचे असतात, तर क्रिकेटर 95 सामने खेळतात आणि 5 सामने कधीकधी फुटबॉलचे खेळतो. तर ही आपल्यासाठी एक क्रिएटिव्ह एक्सपेरिमेंट होती. 70 एमएमवर ब्रॉडवेला कसं क्रिएट कराल..."
राजपाल यादव पुढे बोलताना म्हणाला की, "काय-काय नुकसान झालंय हे गेल्या 10 वर्षांमध्ये, पण तुम्ही खूप काही हिसकावण्याचा प्रयत्न करु शकता, पण जे हसू देवानंच दिलंय, ते कोण हिरावू शकतं..."
"कोर्ट नसतं तर, समोरच्या व्यक्ती फाशी लावू शकता..."
जेव्हा राजपाल यादव यांना संपूर्ण कायदेशीर प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, "हा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. कोणीतरी आमची बदनामी करतंय किंवा आमची प्रतिमा खराब करतंय, त्यामुळे आम्ही निराश होत नाही. मी न्यायालयाचे आभार मानतो, कारण जर न्यायालय नसतं तर आमच्या समोरच्या लोकांनी आम्हाला फाशी दिली असती. न्यायालयानं मला वाचवलं, कारण कोणीही न्यायालयात कारवाई करू शकत नाही. हो, कधीकधी असं घडतं की, एखाद्याकडे 50 पानांचे पुरावे असतात, तर दुसऱ्याकडे फक्त जंग चित्रपटातील संवाद असतो, 'न्यायाधीश साहेब, ज्यांच्याकडे पुरावे नाहीत ते निर्दोष नाहीत..."
राजपाल यादव पुढे म्हणाले की, "मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, हे चित्र या सर्वांपेक्षा खूप वेगळं आहे. मी न्यायालयाचे पुन्हा एकदा आभार मानू इच्छितो की, त्यांनी आमचा मुद्दा इतका समजून घेतलाय..."
राजपालवर कोणत्या फिल्मसाठी पैसे घेतल्याचा आरोप?
राजपाल यादववर 2012 मध्ये आलेल्या 'आता पता लपता' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 5 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर डिजास्टर ठरला. 11 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेल्या या चित्रपटानं फक्त 34 लाखांची ग्रॉस कमाई केलेली. राजपाल व्यतिरिक्त, या सिनेमात असरानी, ओम पुरी, आशुतोष राणा आणि मनोज जोशी यांच्यासह इतर कलाकारांनी काम केलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























