Rajpal Yadav Receives 1.11 Crore: 'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa), 'हंगामा' (Hungama) आणि 'वेलकम' (Welcome) सारख्या सिनेमांमधल्या विनोदी भूमिकांसाठी ओळखला जाणारा राजपाल यादव सध्या अडचणीत सापडला आहे. चेक बाउन्स प्रकरणात राजपाल यादवच्या (Rajpal Yadav) अडचणी वाढल्या असून याचप्रकरणात तिहार तुरुंगात (Tihar Jail) सरेंडर करण्याची वेळ अभिनेत्यावर आली आहे. पडद्यावर त्याच्या भूमिका खळखळून हसवणाऱ्या असल्या तरी, अलिकडेच तो कायदेशीर आणि आर्थिक पेचात अडकला आहे. 9 कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात या अभिनेत्यानं आधीच तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलेलं. आत्मसमर्पण केल्यानंतर, सध्या तो तिथे त्याची शिक्षा भोगतोय. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrity) मदतीचा हात पुढे केला आणि आर्थिक देणग्याही जाहीर केल्या आहेत. दरम्यान, राव इंद्रजित सिंह यादव यांनीही राजपाल यादवला 1.11 कोटी रुपयांच्या मदतीची ऑफर दिली आहे. राव इंद्रजित सिंह यादव कोण आहेत? हे माहितीय का? 

जेम ट्यून्स म्युझिकचे मालक आणि संगीत निर्माता राव इंद्रजित यादव यांनी राजपाल यादवला 1.11 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ही मदत अशा वेळी केली आहे, जेव्हा अभिनेता दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादामुळे मोठ्या आर्थिक पेचात सापडला आहे. आपल्या निर्णयाबद्दल बोलताना राव इंद्रजीत सिंह यादव यांनी आयएएनएसला सांगितलं की, "राजपालजींनी प्रेक्षकांना खूप आनंद दिलाय आणि ते भारतीय चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग आहेत. हा पाठिंबा पैशाबद्दल नाही, तर कठीण काळात सहकाऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याबद्दल आहे. आमचा उद्योग एक कुटुंब आहे आणि कुटुंब कठीण काळात एकमेकांना साथ देतं..."

राव इंद्रजित सिंह यादव आणि ED ची धाड

यापूर्वी, ईडीनं राव इंद्रजित यादव यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात दिल्ली, गुरुग्राम आणि हरियाणातील रोहतक येथील दहा ठिकाणी छापे टाकल्याचा दावा केलेला. त्यांनी दावा केला होता की, त्यानंतर राव इंद्रजित युएईला पळून गेला आहे. ईडीच्या धाडीत पाच लग्झरी कार, बँक लॉकर, 1.7 लाखांची रोख, अनेक गुन्हेगारी कागदपत्रं, डिजिटल उपकरणं आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे.

राव इंद्रजित सिंह यादव कोण?

राव इंद्रजित यादवकडे जेम रेकॉर्ड्स एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक म्युझिक कंपनी आहे, जी 'जेम्स ट्यून्स' नावानं चालते. 2006 मध्ये राव इंद्रजित यादव यांनी सुरू केलेले 'जेम्स ट्यून्स' हे एक व्हिडीओ-ऑन-डिमांड (OTT) प्लॅटफॉर्म आहे, जो हरियाणवी, पंजाबी आणि हिंदीमध्ये प्रादेशिक गाणी तयार करतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: 'मी काय करावं? माझ्याकडे पैसेच नाहीत...', तिहार तुरुंगात सरेंडर केलेला राजपाल यादव भावूक; अभिनेत्याच्या अडचणी संपेचना