कधीकाळी राजपालच्या घरी पोटभर जेवायचा, कठीण काळात 'जिवलग' नवाजुद्दीन कुठे गायब झाला? चाहत्यांनी केलं ट्रोल
राजपालचा जवळचा मित्र मानला जाणारा नवाजुद्दीन सिद्दीकी याने अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नसल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Nawazuddin Siddiqui on Rajpal Yadav: बॉलिवूडचा लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. चेक बाऊन्स प्रकरणात दिल्लीतील तिहार कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत आहे. कर्ज फेडण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या अनेक मुदतीनंतरही रक्कम भरता न आल्याने राजपालने अखेर शरणागती पत्करली. याआधी त्याने आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगितले होते. “माझ्याकडे पैसे नाहीत, मदतीला धावून येईल असा मित्रही नाही,” असे भावनिक विधान त्याने केले होते. अनेक बॉलिवूड लिब्रिटींनी (Bollywood Celebrity) मदतीचा हात पुढे केला आणि आर्थिक देणग्याही जाहीर केल्या आहेत.
मदतीचे आश्वासन, पण नवाजुद्दीनची शांतता चर्चेत
राजपालच्या या वक्तव्यानंतर चित्रपटसृष्टीतील काही कलाकार पुढे आले. सोनू सूद, गुरमीत चौधरी, राव इंद्रजीत सिंह, केआरके यांनी मदतीचे आश्वासन दिले. तसेच तेज प्रताप यादव यांनी 11 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, राजपालचा जवळचा मित्र मानला जाणारा नवाजुद्दीन सिद्दीकी याने अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नसल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
नेटिझन्सना राजपालचे “माझा कोणी मित्र नाही” हे विधान खटकले. कारण एक काळ असा होता, जेव्हा संघर्षाच्या दिवसांत नवाजुद्दीनला राजपालने घरात आसरा दिला, जेवण दिले. अनेक नवोदित कलाकारांसाठी त्याचे घर जणू ‘लंगर’सारखे खुले होते, असे स्वतः नवाजुद्दीनने एका मुलाखतीत सांगितले होते.
Rajpal Yadav’s words while going to jail:
— Sakshi (@SakshiPrime) February 10, 2026
“No one truly belongs to anyone. I must face this crisis on my own.”
Rajpal Yadav produced a film that failed at the box office. He fell into heavy debt. A cheque bounced, and he was sentenced to six months in jail.
Nawazuddin Siddiqui… pic.twitter.com/mHGJwuFRD2
जेल जाते वक़्त राजपाल यादव के शब्द-
— Shoonya (@ShoonyaPoetry) February 10, 2026
“कोई किसी का नहीं है, इस संकट से मुझे खुद ही निकलना है”
राजपाल यादव ने एक फ़िल्म बनाई, फ़िल्म नहीं चली और कर्जा में डूब गए, एक चेक बाउंस हो गया जिसके लिए 6 महीने की सज़ा मिली है
नवाजुद्दीन सिद्दीकी बताते हैं कि- जब हम लोग स्ट्रगल कर रहे… pic.twitter.com/rhOtmPl4No
नवाजुद्दीनचे जुने कौतुकाचे शब्द व्हायरल
‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला होता की, त्याने आणि राजपालने लखनऊच्या BNA आणि दिल्लीच्या NSDमध्ये एकत्र अभिनयाचे शिक्षण घेतले. “इंडस्ट्रीत सर्वाधिक शैक्षणिक प्रशिक्षण आमच्याकडे आहे. राजपाल खूप उदार मनाचा आहे. आम्ही संघर्ष करत असताना त्याने अनेकांना मदत केली,” असे तो म्हणाला होता.
आता मात्र या जुन्या विधानांची आठवण करून देत सोशल मीडियावर नवाजुद्दीनवर टीका होत आहे. “इंडस्ट्रीतील नाती खोटी असतात,” “पैसे असूनही मदत का नाही?” असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या चर्चेवर नवाजुद्दीन काय प्रतिक्रिया देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























