Rajkummar Rao Reacts to Trollers on NEET Post: बॉलिवूड अॅक्टर राजकुमार राव (Rajkumar Rao) सध्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेत आहे. चर्चेत असण्यामागे त्याचा आगामी सिनेमा नसून, NEET- UG (CJP Protest) परीक्षेच्या वादावर डिलिट केलेल्या कमेंटमुळे (Cockroacj Janta Party) होत आहे. आता त्याच्या डिलिट केलेल्या कमेंटचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यानं कमेंटमध्ये, 'किती दबाव असतो. हे तुम्हाला कधीच कळणार नाही', असं म्हटलं होतं. काही दिवसांपूर्वी राजकुमार कुमार राव आणि इतर कलाकारांचा 'मोदी है तो मुमकिन है' हे गाणं व्हायरल झालं होतं. या गाण्यावरुन राजकुमार रावला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
अलिकडेच, राजकुमार रावने NEET _ UG पेपर फुटी प्रकरणावरुन विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेणे, शांततापूर्ण संवाद साधणे, तसेच निष्पक्ष शिक्षण व्यवस्था यावर भर दिला. त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एकाने कमेंट सेक्शनमध्ये जुन्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला. एकाने राजकुमार रावच्या पोस्टवर, 'मी आधी तुमचा खूप आदर करायचो. पण'मोदी हैं तो मुमकिन हैं' या प्रोपेगेंडा गाण्यात काम केल्यामुळे तुम्ही तो आदर गमावला', असं त्याने म्हटलं.
राजकुमार रावची व्हायरल पोस्ट (Rajkumar Rao on NEET UG Post)
तर आणखी एकाने कमेंटमध्ये, 'मी तुमचे सगळे चित्रपट पाहतो. मी कधी विचार केला नव्हता की, तुम्ही इतक्या सहजपणे तडजोड कराल', राजकुमार रावने या कमेंटवर लांबलचक रिप्लाय दिला होता. काही जणांनी त्याच्या रिप्लायचा स्क्रिनशॉट काढला. तसेच सोशल मीडियात शेअर केला. राजकुमार रावच्या रिप्लायचा स्क्रिनशॉट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
राजकुमारने रिप्लायमध्ये म्हटलं की, 'मी कधीही माझा आत्मा विकणार नाही. एक गाणं मी कोण आहे, मी नक्की काय विचार करतो, माझी नेमकी काय तत्वे आहेत, हे ठरवत नाही. यात किती दबाव असतो, हे तुम्हाला कधी कळणार नाही. मी जे योग्य आहे, जे लोकांना एकत्र आणते, त्याच्या बाजूने उभा आहे. जोपर्यंत मी ईमानदारीने मेहनत करतो. तोपर्यंत मला इतर कोणत्याही गोष्टीची पर्वा नाही. जे मला वैयक्तिक ओळखतात, त्यांना माहित आहे, मी कोणत्या प्रकारचा माणूस आहे. मला आशा आहे की, मी तुमचा आदर परत मिळवेन', असं त्याने कमेंटमध्ये म्हटलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं
