rajinikanth : दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचा कुली सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतोय. सध्या त्यांचा नवा चित्रपट ‘कुली’ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. 14 ऑगस्टला प्रदर्शित झालेला हा सिनेमा केवळ 15 दिवसांतच 500 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. मात्र ‘कुली’ हा एकमेव चित्रपट नाही, यापूर्वीही रजनीकांत यांच्या अनेक चित्रपटांनी 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या त्या सुपरहिट चित्रपटांविषयी...
1. 2.0 (2018)
रजनीकांत यांच्या ब्लॉकबस्टर ‘2.0’ या चित्रपटात अक्षय कुमारने खलनायकाची दमदार भूमिका केली होती. एमी जॅक्सन आणि ऐश्वर्या राय हेसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. या चित्रपटाने जगभरात तब्बल 700 कोटींची कमाई केली होती आणि बॉक्स ऑफिसवर जोरदार हिट ठरला होता.
2. जेलर (2023)
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘जेलर’ हा रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा हिट ठरला. अॅक्शन आणि कॉमेडीने भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलला. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया आणि मोहनलाल यांसारखे दिग्गज कलाकार दिसले. जगभरात या चित्रपटाने 650 कोटींहून अधिक कलेक्शन केले होते.
3. कुली (2024)
रजनीकांत यांच्या नव्या ‘कुली’ चित्रपटात त्यांच्या सोबत श्रुती हासन आणि नागार्जुन झळकले आहेत, तर आमिर खान खास कॅमियोमध्ये दिसला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत या सिनेमाने 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून अजूनही जोरदार गतीने पुढे जात आहे.
रजनीकांत यांच्या चित्रपटांचा जादू केवळ दक्षिण भारतापुरता मर्यादित नसून, जगभरातील प्रेक्षक त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी उत्साहाने गर्दी करतात. त्यामुळेच त्यांचा प्रत्येक नवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड निर्माण करताना दिसतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
