Rajeshwari Kharat Makhamali song video : अभिनेत्री राजेश्वरी खरातच्या 'कलवरी' या चित्रपटातील पहिलं गाणं 'मखमली' आज (दि.19) प्रेक्षकांसमोर आलं आहे. (Rajeshwari Kharat Makhamali song video) काही दिवसांपूर्वी या गाण्याचा टीझर राजेश्वरी खरात हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. (Rajeshwari Kharat Makhamali song video) आता यूट्यूबवर प्रदर्शित झालेलं हे गाणं प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत आहे. राजेश्वरीने गाण्याचा व्हिडिओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. (Rajeshwari Kharat Makhamali song video) या गाण्यात राजेश्वरी खरातचा आतापर्यंतचा सर्वात रोमँटिक लूक पाहायला मिळतो.

राजेश्वरी खरातच्या 'मखमली' गाण्याला नेटकऱ्यांचा भरभरुन प्रतिसाद 

'मखमली' या गाण्याचे बोल प्रदीप बी. टोंगे यांनी लिहिले असून, गायक ओंकार स्वरूप यांनी हे गाणं गायलं आहे. प्रदीप बी. टोंगे आणि मंगेश वैजिनाथ शेंडगे यांनी याचे दिग्दर्शन केलं आहे. गाण्याचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला जबरदस्त प्रतिसाद दिला होता. या गाण्यात राजेश्वरीसोबत राहुल दराड याचाही खास डान्स पाहायला मिळतो. ग्रामीण भागातील वातावरणात, नदीकिनारी या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. (Rajeshwari Kharat Makhamali song video) 

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून राजेश्वरी खरातने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा नैसर्गिक अभिनय, साधेपणातली मोहकता आणि प्रत्येक भूमिकेतले प्रामाणिकपणं यामुळे ती अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. ती केवळ व्यावसायिक यशाकडे लक्ष देत नाही, तर दर्जेदार कलाकृतींसाठी देखील मेहनत घेते, हे तिच्या कामगिरीतून स्पष्ट होतं. (Rajeshwari Kharat Makhamali song video) 

चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही क्षेत्रांत तिने आपली छाप सोडली आहे. राजेश्वरी खरात हिने तिच्या करिअरची सुरुवात 'फँड्री' या चित्रपटातील शालूच्या भूमिकेपासून झाली. मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ती पुढे मुख्य भूमिकांमध्ये झळकू लागली. पडद्यावर दिसताना तिच्या चेहऱ्यावरील निरागस भाव, वास्तवतेशी जवळीक साधणारा अभिनय आणि भावनांची उबदारता प्रेक्षकांना सहज भावते. फँड्रीनंतर राजेश्वरी खरात हिने अनेक गाण्यांमध्ये काम केलं. शिवाय चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. मात्र, मराठी इंडस्ट्रीतील गटा-तटांचा राजेश्वरी खरातला तिच्या कारकीर्दीत फटका बसला. (Rajeshwari Kharat Makhamali song video) 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Marathi Actor Dada Kondke Death Story: '...मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन गेले'; दादा कोंडकेंच्या निधनानंतर ॲम्ब्युलन्सही मिळाली नव्हती, काय घडलेलं? लेखिकेनं स्पष्ट सांगितलं