Rajesh Khanna Iconic Movie: बॉलिवूडचा (Bollywood News) पहिला सुपरस्टार म्हणजे, चाहत्यांचे लाडके बाबुमोशाय म्हणजेच, राजेश खन्ना (Rajesh Khanna). एक काळ होता, त्यावेळी राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरुण-तरुणी अक्षरशः वेड्या व्हायच्या. त्यांचे सिनेमे पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर लांब रांगा लागल्या होत्या. पण प्रत्येक सिनेस्टारप्रमाणे, राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीतही अनेक चढ-उतार आले. एक काळ असा होता की, त्यांचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत आणि त्यावेळी त्यांच्या स्टारडमला फटका बसेल की, काय? अशी परिस्थितीही निर्माण झाली होती. अशा वेळी राजेश खन्ना यांच्या आयुष्यात एक वळण आलं, ज्यानं सर्व काही बदलून टाकलं.

Continues below advertisement

1973 मध्ये आलेल्या 'दाग' (Daag Movie) चित्रपटाच्या प्रीमियरमधला खाली दिसत असलेला फोटो आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचे तीन मोठे स्टार दिसत आहेत. राजेश खन्ना, शर्मिला टागोर (Sharmila Tagore) आणि यश चोप्रा... या प्रीमियरमध्ये राजेश खन्ना त्यांच्या सुपरस्टार प्रतिमेसह आले होते, तर शर्मिला टागोर यांनी त्यांच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा त्यांच्या शांत आणि स्टायलिश शैलीत दोघांशीही बोलताना दिसत आहेत.

यशराज बॅनरची सुरुवात

1973 मध्ये प्रदर्शित झालेला 'दाग' हा चित्रपट केवळ राजेश खन्ना यांचाच नाही तर, यश चोप्रांचाही पहिला चित्रपट होता. या चित्रपटाद्वारे त्यांनी यशराज बॅनरचा चित्रपट लाँच केला. यश चोप्रा हे त्या काळातील एक निर्माते होते, जे त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते आणि बोल्ड कथा बनवण्यास अजिबात घाबरत नव्हते.

बोल्ड कथानक आणि फक्त नऊ थिएटर

'दाग'ची कथा त्या काळाच्या मानानं थोडी बोल्ड मानली जात होती. यश चोप्रा यांना भीती होती की, हा चित्रपट चांगला चालणार नाही, म्हणून त्यांनी तो फक्त नऊ थिएटरमध्ये प्रदर्शित केला. राजेश खन्ना यांनीही हा निर्णय स्वीकारला आणि कमी पैशात चित्रपट करण्यास होकार दिला. पण नियतीला वेगळंच मान्य होतं. जो विचार यश चोप्रा यांनी केलेला, त्याच्या नेमकं उलट सगळं घडलं. 

चित्रपटाचं बजेट खूपच कमी होतं. राखीनं चित्रपटासाठी तीन लाख रुपये दिले आणि शर्मिला टागोर यांनीही खूपच कमी मानधन घेतलं. एकूणच 'दाग' फक्त 1.40 लाखांमध्ये बनवण्यात आला. पण कमी बजेट असूनही, चित्रपटाची कथा आणि स्टारकास्टनं तो मोठा बनवण्याचं काम केलं.

कमी बजेट आणि मर्यादित स्क्रीन असूनही, 'दाग'ने 6.50 कोटींचा व्यवसाय केला आणि बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटानं हे सिद्ध केलं की, योग्य कथा आणि योग्य कलाकार कोणाचंही नशीब बदलू शकतात. 'दाग'नं राजेश खन्ना यांच्या मागील अपयशाचे डाग धुवून टाकले आणि त्यांना रातोरात सुपरस्टार बनवलं. यश चोप्रा यांचं नावही बॉलिवूडमध्ये स्थापित झालं. या चित्रपटानं दाखवून दिलं की, थोडीशी जोखीम घेतल्यानं मोठी स्वप्न पूर्ण होऊ शकतात.