Raja Shivaji Release on OTT: मराठी सिनेसृष्टीतील विक्रम मोडणारा राजा शिवाजी (Raja Shivaji) हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट आता अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित हा सिनेमा आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले होते.आता 57 दिवसांनी या चित्रपटानं 0TT वर एन्ट्री घेतलीय.
कुठे रिलिज झालाय राजा शिवाजी ?
साधारणत: 75 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या राजा शिवाजीने थिएटरमध्ये 130 कोटींहून अधिक कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाईचा विक्रम करत बॉक्स ऑफिस हादरवलं होत. याआधी सैराटच्या नावावर असलेला विक्रम या चित्रपटाने मोडला. इतकंच नाही तर देशांतर्गत 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला.26 जूनपासून Netflix वर उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या काळावर आधारलेला आहे. जन्मापासून स्वराज्य स्थापनेच्या प्रवासापर्यंत आणि अफजल खानाच्या वधापर्यंतचा महत्त्वाचा इतिहास यात दाखवण्यात आला आहे.
बॉलिवूडमधील दिग्गजांच्या अभिनयाने रंगला चित्रपट
चित्रपटाच्या प्रदर्शनापासून 'राजा शिवाजी 'चित्रपटात बॉलिवूडकरांची उपस्थिती प्रेक्षकांच्या मनात ठसली.चित्रपटात ऋतेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून जेनेलिया देशमुख राणी सईबाईंच्या भूमिकेत दिसत आहेत. संजय दत्त यांनी अफझलखानची भूमिका साकारली असून अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन, फरदीन खान, सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे सलमान खान यांचाही खास कॅमिओ या चित्रपटात पाहायला मिळतो.थिएटरमध्ये तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रेक्षकांची पसंती मिळवतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
