Raja Shivaji First Look Teaser: 'राजा शिवाजी'चा (Raja Shivaji) भव्य टीझर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त व तुडुंब प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, सणाचा दिवस असूनही मोठ्या संख्येनं प्रेक्षक 'धुरंधर : द रिव्हेंज' (Dhurandhar The Revenge) पाहण्यासाठी थिएटरमध्ये दाखल झाले होते आणि त्याच वेळी त्यांना 'राजा शिवाजी'च्या टीझरची (Raja Shivaji Teaser) खास झलक अनुभवायला मिळाली.                      

टीझर सुरू होताच थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष पाहायला मिळाला. स्वराज्याच्या प्रेरणादायी गाथेची ही पहिली झलक प्रेक्षकांना भावूक करून गेली. एवढंच नाही, तर अनेक प्रेक्षकांनी या टीझरचे व्हिडिओ कॅप्चर करून आपल्या सोशल मीडियावर, विशेषतः Instagram Reels वर शेअर केले, ज्यामुळे या टीझरची चर्चा आणखी रंगली आहे.                                 

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी प्रस्तुत या चित्रपटात रितेश विलासराव देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत दिसत असून त्यांनीच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया रितेश देशमुख यांनी केली आहे. संगीत अजय-अतुल यांनी दिले असून, छायाचित्रण संतोष सिवन यांनी केले आहे.

टीझरला मिळालेल्या या जबरदस्त प्रतिसादानंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, पूर्ण चित्रपट पाहण्याची आतुरता अधिकच वाढली आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.                                                          

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित 'राजा शिवाजी' हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून शौर्य, सन्मान आणि स्वराज्याच्या जन्मास भव्य आदरांजली अर्पण करणारी ही ऐतिहासिक गाथा प्रेक्षकांना एका विलक्षण सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Raja Shivaji First Look Teaser: शौर्य, सन्मान अन् स्वराज्याच्या गाथेची पहिली झलक; 'धुरंधर द रिव्हेंज'सोबत 'राजा शिवाजी'चा First Look Teaser थिएटरमध्ये रिलीज