Raja Shivaji First Look, Sunjay Dutt: रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) बहुप्रतिक्षित सिनेमा 'राजा शिवाजी'चा टीझर (Raja Shivaji Teaser) मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. खरं तर हा टीझर यापूर्वीच रिलीज करण्यात आलेला. आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित सिनेमा 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar The Revenge) सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला, त्याचवेळी 'राजा शिवाजी'चा (Raja Shivaji) टीझरही रिलीज करण्यात आलेला. सिनेमा पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना हा टीझर दाखवण्यात आला. अशातच आता हा टीझर सर्वांसाठी रिलीज करण्यात आलाय. सिंहासनावर नव्हे, जनतेच्या हृदयावर राज्य करणारे आणि जगातील महान योद्ध्यांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाची एक झलक पाहायला प्रेक्षक फार आतुर झालेले. अखेर टीझर रिलीज झाला असून त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. 

Continues below advertisement

'राजा शिवाजी' सिनेमात रितेश देशमुख (Bollywood Actor Riteish Deshmukh) स्वतः छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानंच केलंय. अगदी थक्क करणाऱ्या या टीझरमध्ये इतरही कलाकारांची झलक पाहायला मिळाली. अनेक बडे बॉलिवूड स्टार्स या टीझरमध्ये दिसले. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढलीय. 

'राजा शिवाजी'च्या कथेला अधिक भव्य बनवण्यासाठी सिनेमात हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र आलेत. या सिनेमात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, बोमन इराणी, अमोल गुप्ते आणि जेनेलिया देशमुख यांचाही समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर दमदार स्टारकास्टची चर्चा रंगलीय. 

Continues below advertisement

सर्वात जास्त चर्चा रंगलीय, संजय दत्तनं साकारलेल्या पात्राची. नुकताच संजय दत्तचा 'धुरंधर 2' रिलीज झाला असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. संजय दत्तनं या सिनेमात एसपी असलम चौधरीची भूमिका साकारलीय. प्रेक्षकांनी संजय दत्तच्या भूमिकेला अक्षपशः डोक्यावर उचलून घेतलंय. पण, 'राजा शिवाजी'चा टीझर पाहून आता संजू बाबा त्यापेक्षाही धमाकेदार भूमिकेत दिसणार, हे नक्की झालंय. अनेकांनी संजय दत्तच्या भूमिकेचं भरभरुन कौतुक केलंय. 

छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा मोठ्या पडद्यावर

'राजा शिवाजी' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास अगदी भव्य स्वरूपात साकारण्यात आलाय. जे मराठी सिनेसृष्टीत यापूर्वी क्वचितच पाहायला मिळालंय. छत्रपती शिवाजी महाराज हे पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी दख्खन सल्तनती आणि मुघल साम्राज्याला आव्हान देत स्वतंत्र राज्याची स्थापना केली. आपलं अख्खं आयुष्य 'स्वराज्य' उभारणीसाठी त्यांनी अर्पण केलं. 

1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात छापा टाकत मुघल सेनापती शाइस्ता खानला लक्ष्य केलं, ज्यामुळे त्या भागातील मुघल सत्ता कमकुवत झाली. 1664 मध्ये त्यांनी सूरतवर हल्ला करून मुघलांच्या महत्त्वाच्या व्यापाराच्या शहराला लुटलं. 

1666 मध्ये औरंगजेबानं त्यांना ज्यावेळी आग्र्यात कैद केलं, त्यावेळी त्यांनी तिथून सुटका करून पुन्हा दख्खनमध्ये परतत आपली सत्ता मजबूत केली. 1674 मध्ये रायगडावर त्यांचा 'छत्रपती' म्हणून राज्याभिषेक झाला, ज्यानं सार्वभौम मराठा राज्याची स्थापना अधोरेखित केली. पुढे त्यांनी कर्नाटकपर्यंत आपलं राज्य विस्तारलं. त्यांनी सागरी सुरक्षेसाठी सक्षम नौदल उभारलं आणि स्वराज्य आणखी बळकट केलं. याच महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे पैलू रुपेरी पडद्यावर 'राजा शिवाजी'च्या माध्यमातून उलगडणार आहे. 

Jio Studios प्रस्तुत आणि Mumbai Film Companyच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी निर्मित 'राजा शिवाजी' हा सिनेमा 1 मे 2026 रोजी मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज