Raja Shivaji Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’(Raja Shivaji)चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) आपली पकड कायम ठेवली असून, प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, भव्यदिव्य दृश्यं आणि दमदार अभिनयामुळे ‘राजा शिवाजी’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.  चित्रपटाने रिलीजच्या 20 व्या दिवशी भारतात 2,204 शोमधून तब्बल 1.10 कोटी रुपयांची नेट कमाई केली. या चित्रपटाचे भारतभरातून एकूण नेट कलेक्शन आता 88.10 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 104.19 कोटी रुपये इतके झाले आहे.

Continues below advertisement

भारतातील व जगभरातील कमाई किती ?

रितेश देशमुखने त्याचा 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामाने भारतासह जगभरात चांगलं यश मिळवलं आहे. जेनेलिया देशमुख, संजय दत्त,अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला फक्त भारतातच नाही, तर परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला. 20 व्या दिवशी चित्रपटाने ओव्हरसीज मार्केटमध्ये 0.05 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचे एकूण ओव्हरसीज ग्रॉस कलेक्शन आता 4.15 कोटी रुपयांवर गेले आहे.

दरम्यान, भारत आणि परदेशातील कमाई मिळून ‘राजा शिवाजी' एकूण वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन आता तब्बल 108.34 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मराठी चित्रपटांसाठी हा आकडा अत्यंत मोठा मानला जात असून, आगामी दिवसांत चित्रपट आणखी किती कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तिसऱ्या आठवड्यात 'राजा शिवाजी ' ची घोडदौड कायम असून येत्या वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

पहिला आठवडा: ₹7.70 कोटीदुसरा वीकेंड: ₹17.40 कोटी11वा दिवस (सोमवार): ₹2.65 कोटी12वा दिवस (मंगळवार): ₹2.75 कोटी13वा दिवस (बुधवार): ₹2.10 कोटी14वा दिवस (गुरुवार): ₹2.10 कोटी15वा दिवस (शुक्रवार):₹ 1.45  कोटी 16 वा दिवस (शनिवार):₹ 2.70 कोटी 17वा दिवस(रविवार): ₹3.45 कोटी 18वा दिवस (सोमवार): ₹1.15 कोटी 19 वा दिवस (मंगळवार):₹1.30 कोटी 20 वा दिवस (बुधवार): ₹1.10कोटी 

एकूण कमाई:  ₹1.10 कोटी 

दिग्गज कलाकारांची फौज

सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे दमदार संगीत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांचे अप्रतिम छायांकन या चित्रपटाला वेगळीच उंची प्रदान करत आहे. प्रत्येक फ्रेममध्ये भव्यता आणि ऐतिहासिक वास्तवतेची झलक जाणवते. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे, ज्यामुळे या चित्रपटाचा आवाका अधिकच भव्य झाला आहे.