Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) सिनेमाची दिमाखदार कामगिरी पाहून मराठी रसिकप्रेक्षकांची मान अभिमानानं उंचावली आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाची (Raja Shivaji Movie) निव्वळ कमाई 93 कोटींच्या पुढे असून जगभरातील कमाई 114.80 कोटींच्या पार गेली आहे.
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या चित्रपटाने देशांतर्गत आणि परदेशातही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली असून, भारतात 93 कोटी रुपयांची निव्वळ आणि जगभरात 114.80 कोटी रुपयांची एकूण कमाई करून आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा ठरला आहे.
ऐतिहासिक ओपनिंगसह विक्रमांची नोंद केल्यानंतर आणि पहिल्या दोन आठवड्यांत उल्लेखनीय सातत्य राखल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिलेल्या या महाकाव्याला तिसऱ्या वीकेंडला पुन्हा एकदा प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मराठी आणि हिंदी दोन्ही आवृत्त्यांमध्ये मिळालेल्या उत्कृष्ट मौखिक प्रसिद्धी आणि कौतुकामुळे, सिनेमाला प्रेक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळतोय.
'राजा शिवाजी' सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची कमाई (Raja Shivaji BO Collection)
- पहिला आठवडा: 57.70 कोटी
- दुसरा आठवडा: 27.00 कोटी
- तिसरा आठवडा: 15 वा दिवस (शुक्रवार): 1.70 कोटी 16 वा दिवस (शनिवार): 2.90 कोटी 17 वा दिवस (रविवार): 3.80 कोटीभारतातील एकूण कमाई: 93.10 कोटी निव्वळ भारतातील एकूण कमाई: 109.90 कोटी
- परदेशातील एकूण कमाई: 4.90 कोटी
- जगभरातील एकूण कमाई: 114.80 कोटी
तिसऱ्या आठवड्यातील दमदार कामगिरीमुळे बॉक्स ऑफिसवरील आपला प्रवास अधिक मजबूत झाल्याने, 'राजा शिवाजी' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण ब्लॉकबस्टर यशस्वी चित्रपट म्हणून उदयास येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
