Raja Shivaji Box Office Collection: 1 मे रोजी प्रदर्शित झालेला 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपट प्रदर्शित होऊन 21 दिवस पूर्ण झाले आहेत. छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पहिल्या दिवसापासून दमदार कमाई केली .. मराठी सिनेसृष्टीचे अनेक व्यावसायिक नियम मोडीत काढत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट दिमाखात कामगिरी करतोय. तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतर या चित्रपटाच्या कमाईचा ग्राफ थोडा उतरला असला तरी या वीकेंडचा चित्रपटाला फायदा होऊ शकतो. दरम्यान, साउथ सुपरस्टार मोहनलाल यांचा बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3 ' चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची जगभरात मोठी चर्चा आहे. त्यामुळे 'राजा शिवाजी' चित्रपटाला कितपत प्रतिसाद मिळतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Continues below advertisement

राजा शिवाजीचं आतापर्यंतचे कलेक्शन

रितेश देशमुख दिग्दर्शित व अभिनित राजा शिवाजी या ऐतिहासिक ॲक्शन ड्रामाने भारतासह जगभरात चांगली कमाई केली. या चित्रपटाने जगभरात 110.10 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर भारतभरात 89.55 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन या चित्रपटाने केले आहे. दरम्यान, 21व्या दिवशी या चित्रपटाने 0.99 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 12 कोटी रुपये कमावले. 

बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती असल्यामुळे या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. जेनेलिया देशमुख, संजय दत्त,अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला फक्त भारतातच नाही, तर परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला.

Continues below advertisement

पहिला आठवडा: ₹7.70 कोटीदुसरा वीकेंड: ₹17.40 कोटी11वा दिवस (सोमवार): ₹2.65 कोटी12वा दिवस (मंगळवार): ₹2.75 कोटी13वा दिवस (बुधवार): ₹2.10 कोटी14वा दिवस (गुरुवार): ₹2.10 कोटी15वा दिवस (शुक्रवार):₹ 1.45  कोटी 16 वा दिवस (शनिवार):₹ 2.70 कोटी 17वा दिवस(रविवार): ₹3.45 कोटी 18वा दिवस (सोमवार): ₹1.15 कोटी 19 वा दिवस (मंगळवार):₹1.30 कोटी 20 वा दिवस (बुधवार): ₹1.10कोटी 21वा दिवस (गुरुवार): ₹0.99 कोटी 

राजा शिवाजीसमोर दृश्यम 3 चं वादळ

साउथ सुपरस्टार मोहनलाल यांचा बहुप्रतिक्षित दृश्यम 3 चित्रपटाची सध्या जगभरात चांगलीच चर्चा आहे.21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच 43.37 कोटी रुपयांची ऐतिहासिक ओपनिंग मिळवली. विशेष म्हणजे यातील 25 कोटींचे कलेक्शन हे आंतरराष्ट्रीय आहे. मोहनलाल यांचा हा थ्रिलर चित्रपट आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा मल्याळी चित्रपट ठरला आहे. 1500 हून अधिक स्क्रीन स्वर पहिल्या दिवशी हा चित्रपट पाहिला गेला. देशांतर्गत या चित्रपटाने 5506 शोमधून 18.36 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे 'राजा शिवाजी ' चित्रपटाला या वीकेंडला कितपत यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेट कमाईमध्ये 89.65 कोटी रुपयांचे कलेक्शन करणारा 'राजा शिवाजी' 100 कोटींचा नेट कलेक्शनचा टप्पा गाठणार का? हे पाहण्यासारखे आहे.