Raja Shivaji Box Office Collection Day 5: रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा (Raja Shivaji Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धमाकेदार कमाई करतोय. 1 मे रोजी रिलीज झालेल्या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जणू तुफान आणलं. सध्या सिनेमा प्रचंड गाजत असून त्यानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. पहिल्या वीकेंडला विक्रमी कमाई केल्यानंतर, पाचव्या दिवशीसुद्धा सिनेमानं धमाकेदार कमाई केली आहे. सिनेमानं रिलीजच्या पाच दिवसांत (Raja Shivaji Box Office Collection Day 5) तब्बल 47.50 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'सॅकनिल्क'ने दिलेल्या आकडेवारीनुसार, 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Film) सिनेमानं सोमवारी 5.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या सिनेमानं शुक्रवारी 12.40 कोटी रुपये कमावलेत. शनिवारी सिनेमानं 11.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. रविवारी सिनेमानं तब्बल 13.10 कोटी रुपयांची कमाई केली. रविवारच्या तुलनेत सोमवारी या सिनेमाची कमाई निम्म्याहून कमी झाली आणि सिनेमानं 5.60 कोटींचं कलेक्शन केलंय. त्यानंतर मंगळवारीसुद्धा सिनेमाच्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली. म्हणजेच, पाचव्या दिवशी सिनेमानं 4.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाचं 5 दिवसांचं कलेक्शन 47.50 कोटी रुपये झाले आहे.
अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून रितेश विलासराव देशमुख (Riteish Vilasrao Deshmukh) यांनं पडद्यावर आणि पडद्यामागे अत्यंत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे रितेश देशमुखच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता निर्माण झालेली. शिवचरित्रावर आधारित असलेला हा सिनेमा केवळ ऐतिहासिक कथा मांडत नाही, तर स्वाभिमान, शौर्य आणि नेतृत्वाची प्रेरणादायी गाथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करतो.
'राजा शिवाजी'मध्ये झळकलीय तगडी स्टारकास्ट
रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. संजय दत्त (Sunjay Dutt), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), विद्या बालन (Vidya Balan), महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), सचिन खेडेकर (Sachin Khedekar), बोमन इराणी (Boman Irani), भाग्यश्री (Bhagyashree), फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारखी तगडी स्टारकास्ट झळकली आहे. या कलाकारांच्या दमदार अभिनयासोबतच भव्य सेट्स, उत्कृष्ट तांत्रिक मांडणी आणि दमदार सीन्स यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
