कलाकारांच्या आवडीनिवडी फार वेगवेगळ्या असतात. कुणाला कला आवडते. कुणाला भटकायला आवडतं तर कुणाला तासनतास गाणी ऐकायला आवडत असतात. पण या सगळ्यात एक कॉमन फॅक्टर असतो तो खाण्याचा. प्रत्येकाला काही ना काहीतरी खायला आवडत असतं. सध्या राजा राणीची गं जोडी या मालिकेतला डॅशिंग रणजीत ढाले-पाटील हा तरूणाईच्या बाजारात ईन ट्रेंड आहे. याची खायची आवड लक्षात घेऊन तर त्याच्यावर सगळी फिदा झाली आहेत.


रणजीत ढाले पाटील अशी ती व्यक्तिरेखा जरी असली तरी त्यात काम करणाऱ्या कलाकाराचं नाव आहे मणिराज पवार. हा मूळचा येवल्याचा. पूर्वी येवल्याची पैठणी फेमस होती. आता या पैठणीसह मणिराजनेही या गावाला आणखी एक ओळख मिळवून दिली आहे. पण मणिराजची आवडनिवड ऐकाल तर थक्क व्हाल. मणिराजला मटण खायला भयंकर आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीचं मटण खाणं हा त्याचा शौक आहे. त्याने एकदा बोलात बोलता हे आपल्या मित्रांना सांगितलं. यात त्याला कोल्हापूरी मटण तर आवडतंच. पण त्याच्यासोबत सांगलीचं काळ्या मसाल्यातलं मटण.. विदर्भातलं सावजी मटणं.. नाशिकमधलं मटण असं वेगवेगळे प्रिपरेशन असलेल्या मटणाच्या थाळ्या त्याला फार आवडतात.


करण जोहरच्या 'त्या' पार्टीच्या क्लिपचा फोरेन्सिक रिपोर्ट आला, पण..


लोकांना त्याच्या मटणाच्या या शौकविषयी कळल्यावर तर पुरुष मंडळीही फिदा झाली आहेत. त्याला सेटवर किंवा कुठेही भेटायला मिळालं की बऱ्याचदा मटणाच्या पंगतीला बोलवलं जातं. प्रत्येकवेळी मणिराजला तिथे जाता येतंच असं नाही. पण या प्रेमळ आग्रहाने तोही भारावून जातो. राजा राणीची गं जोडी या मालिकेचं चित्रिकरण सध्या सांगलीत सुरू आहे. त्यामुळे परिसरात बनणाऱ्या मटणावर त्याने ताव मारलेला आहेच. शिवाय इतर वेगवेगळ्या प्रकारचं जेवण जेवायलाही त्याला आवडतं. गंमत अशी की प्रवासाच्या निमित्ताने तो ज्या ज्या गावात गेला आहेत तिथे त्याने मटणाची डीश चाखलेली नाही असं झालेलं नाही. त्याला अनेक ठिकाणी कसं मटण मिळतं हे पक्कं माहीत आहे.


त्याची ही आवड लक्षात घेऊन त्याचे अनेक चाहते त्याच्यासाठी डब्यात मटण घेऊनही येतात. मणिराजही चाहत्यांच्या या प्रेमामुळे पुरता भारावून गेला आहे.


Bollywood drug probe | दीपिका, सारा, श्रद्धाचे मोबाईल केले जप्त; तपासणीसाठी फॉरेन्सिकला पाठवणार