Raid 2 Box Office Collection Day 4: अजय देवगणचा (Ajay Devgn) बहुप्रतिक्षित चित्रपट 'रेड 2' (ईोग् 2) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट होता. हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आणि अनेक चित्रपटांशी टक्कर होऊनही, त्याला चांगली सुरुवात मिळाली. यानंतर, आठवड्याच्या शेवटी अजय देवगणच्या सिनेमानं धमाल केली आणि खूप कमाई केली. अशातच, 'रेड 2'नं चौथ्या दिवशी म्हणजेच, रविवारी किती कमाई केली?

Continues below advertisement

'रेड 2'नं चौथ्या दिवशी किती कमाई केली?

2018 च्या ब्लॉकबस्टर 'रेड' चा सिक्वेल असलेला 'रेड 2' हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. या चित्रपटाद्वारे, अजय देवगणनं पुन्हा एकदा आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत पुनरागमन केलंय आणि आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकलीत. चित्रपटात एका भ्रष्ट नेत्याची भूमिका साकारणाऱ्या रितेश देशमुखचा अभिनयही कौतुकास्पद आहे. संपूर्ण फिल्ममध्ये काय भाव खाऊन गेलं, तर ते डायलॉग्स. धमाकेदार डायलॉग्स प्रेक्षकांना आपलंस करत आहेत.  

एकूणच 'रेड 2'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे आकर्षित होत आहेत. यासोबतच, 'रेड 2'नं चांगली कमाईही केली आहे आणि आठवड्याच्या शेवटी, त्यावर पैशांचा पाऊस पडला. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, 

  • 'रेड 2'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 19.25 कोटी रुपये कमावले होते.
  • दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 12 कोटी रुपये कमावले.
  • 'रेड 2'नं तिसऱ्या दिवशी 18 कोटींचा गल्ला जमवला.
  • सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'रेड 2'नं रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी 21.25 कोटी रुपये कमावले आहेत.
  • यासह, 'रेड 2'चं चार दिवसांत एकूण कलेक्शन आता 70.50 कोटी रुपये झाले आहे.

'रेड 2'नं रचला धमाकेदार विक्रम

'रेड 2' रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच नवे विक्रम रचत आहे. तसेच, पहिल्या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट 2025 चा सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला. कोई मोईच्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक कमाई करणारे हे टॉप 5 चित्रपट आहेत.

चित्रपटाचं नाव कमाई (कोट्यवधींमध्ये)
छावा 121.43 कोटी
सिकंदर 86.4 कोटी
स्काई फोर्स 73.20 कोटी
रेड 2 70.50 कोटी
जाट 40.62 कोटी 

'रेड 2' ने चार दिवसांत बजेटपेक्षा जास्त कमाई केली

'रेड 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रविवारी या चित्रपटानं मोठी कमाई केलीय. साऊथच्या रेट्रो आणि 'हिट 3' व्यतिरिक्त, हॉलिवूड चित्रपट 'थंडरबोल्ट्स' देखील सध्या थिएटरमध्ये सुरू आहे. दरम्यान, 'केसरी 2' आणि 'जाट' हे चित्रपट सध्या थिएटरमध्ये सुरू आहेत. या सर्वांमध्ये 'रेड 2' सर्वाधिक कमाई करत आहे. एवढंच नाही तर, अजय देवगण स्टारर चित्रपटानं रिलीजच्या फक्त चार दिवसांत त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'रेड 2' चा खर्च 48 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे आणि चार दिवसांत त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. आता चित्रपट 100 कोटी रुपयांकडे वाटचाल करत आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता, पहिल्याच आठवड्यात चित्रपट शतक ठोकेल अशी अपेक्षा आहे. 

राजकुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर आणि सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अजय लवकरच 'धमाल 4' मध्ये रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि अर्शद वारसीसोबत दिसणार आहे. याशिवाय, त्याच्याकडे मृणाल ठाकूरसोबत 'सन ऑफ सरदार 2' देखील आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PHOTO: ब्रेस्ट साईजपासून बॉडी शेमिंगपर्यंत; जेव्हा 'या' अभिनेत्रींवर कमेंट करताना ट्रोलर्सनी ओलांडलेल्या सर्व मर्यादा