Raid 2 Box Office Collection Day 2: अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रेड 2' (Raid 2) हा चित्रपट महाराष्ट्र दिनानिमित्त म्हणजेच, 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच बरीच हवा निर्माण केली होती, ज्यामुळे देशभरात त्याचं अॅडव्हान्स बुकिंग खूप झालं आणि अपेक्षेप्रमाणे 'रेड 2' (Raid 2 Movie) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) ब्लॉकबस्टर सुरुवात केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटाची टक्कर संजय दत्तच्या 'भूतनी'सोबतच, दोन साऊथ इंडियन चित्रपट 'हिट 3' आणि 'रेट्रो' व्यतिरिक्त हॉलिवूड फिल्म 'थंडरबोल्ट्स' (Thunderbolts*) यांच्याशी आहे. पण नव्या बॉक्स ऑफिसवर रिलीज करण्यात आलेल्या चित्रपटांमध्येही 'रेड 2' ची धमाकेदार ओपनिंग झाली. दुसऱ्या दिवशी 'रेड 2'नं बॉक्स ऑफिसवर किती कमावले? सविस्तर पाहूयात...
'रेड 2'नं रिलीजच्या दुसऱ्या दिवशी किती कमाई केली?
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड'चा सिक्वेल आहे. या चित्रपटाद्वारे अजय देवगणनं पुन्हा एकदा आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आणि आपल्या दमदार अभिनयानं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय. हा चित्रपट 2025 सालचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, ज्यानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 19.25 कोटी रुपयांची कमाई केली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'रेड 2' ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 11.75 कोटी रुपये कमावले आहेत.
- यासह, 'रेड 2' ची दोन दिवसांत एकूण कमाई 31 कोटी रुपये झाली आहे.
- 'रेड 2' नं दुसऱ्या दिवशी 2025 च्या या चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलं आहे.
- 'रेड 2' नं दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई केली आहे, जरी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाली असली तरी, त्याने
- 2025 च्या अनेक चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनला टाकले आहे.
बॉलिवूड हंगामाच्या आकडेवारीनुसार, 'रेड 2' ने 'या' चित्रपटांना मागे टाकलंय
| चित्रपटाचं नाव | कमाई |
| ग्राउंड जीरो | 5 कोटी |
| सुपरबॉयज ऑफ मालेगांव | 3.54 कोटी |
| क्रेजी | 11.09 कोटी |
| मेरे हसबंड की बीवी | 9.38 कोटी |
| लवयापा | 7.04 कोटी |
| बॅडएस रवि कुमार | 9.66 कोटी |
| इमरजेंसी | 16.52 कोटी |
| आजाद | 6.32 कोटी |
| फतेह | 12.85 कोटी |
| गेम चेंजर | 26.60 कोटी |
'रेड 2' त्याचे बजेट वसूल करण्यापासून फक्त इंचभर दूर
'रेड 2' हा चित्रपट फक्त 48 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांत 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवल्यानं, या चित्रपटानं त्याच्या बजेटच्या 80 टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल केली आहे. अशातच आता अजयच्या सिनेमाला त्याचं भांडवल वसूल करण्यासाठी आणखी 18 कोटी रुपयांची कमाई करण्याची गरज आहे. या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट आपलं भांडवलं वसूल करेल आणि त्यानंतर बक्कळ नफा कमावेल, त्यामुळे 'रेड 2' हिट होईल, अशी अपेक्षा आहे.
'रेड 2' ची स्टार कास्ट
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' हा एक हिंदी क्राईम थ्रिलर चित्रपट आहे, जो 'रेड' (2018) या चित्रपटाच्या सात वर्षांनंतर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा आयआरएस अधिकारी अमय पटनायक (अजय देवगण) यांच्याभोवती फिरते. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.