Raid 2 Box Office Collection Day 15: अजय देवगणचा 'रेड 2' चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 'रेड 2' हा चित्रपट 1 मे रोजी इतर अनेक चित्रपटांसह थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, सर्वांना मागे टाकत नंबर 1 ची पसंती मिळवली आहे. हा चित्रपट 'छावा' नंतर 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे. 'रेड 2' ने रिलीजच्या 15 व्या दिवशी म्हणजे तिसऱ्या गुरुवारी किती कमाई केली ते जाणून घेऊयात.

Continues below advertisement


'रेड 2' ने 15 व्या दिवशी किती कमाई केली?


'रेड 2' ने हे सिद्ध केले आहे की जर चांगली कंटेंट आणि स्टारकास्टचा दमदार अभिनय असेल तर चित्रपट हिट होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जे काम सलमान खानचा सिकंदर, अक्षयचा केसरी 2 आणि सनी देओलचा जट करू शकला नाही, ते काम अजय देवगणच्या 'रेड 2' ने केले आहे. फक्त 48 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने दुप्पटपेक्षा कितीतरी पटीने जास्त कमाई केली आहे, ज्यामुळे निर्माते सध्या मालामाल झाले आहेत. दरम्यान, प्रदर्शित झाल्याच्या 15 व्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाली. 


- 'रेड 2' ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 95.75 कोटी रुपये कमावले होते.
- या चित्रपटाने नवव्या दिवशी 5 कोटी रुपये आणि दहाव्या दिवशी 8.25 कोटी रुपये कमावले.
- 11 व्या दिवशी 'रेड 2' ने 11.75 कोटी रुपये कमावले आणि 12 व्या दिवशी चित्रपटाचा व्यवसाय 4.85 कोटी रुपये इतका होता.
- 'रेड 2' ने 13 व्या दिवशी 4.5 कोटी रुपये आणि 14 व्या दिवशी 3.25 कोटी रुपये कमावले.
- 'सकनिल्क'च्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, 'रेड 2' ने रिलीजच्या 15 व्या दिवशी 3.00 कोटी रुपये कमावले आहेत.
- यासह, 'रेड 2' ची 15 दिवसांत एकूण कमाई आता 136.35 कोटी रुपये झाली आहे.


'रेड 2' ला 150 कोटी रुपये कमवण्यासाठी किती कोटींची गरज?


'रेड 2' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर 15 दिवसांत 136 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता 150 कोटी रुपयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 15 कोटी रुपये कमवायचे आहेत. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाची कमाई वाढेल आणि तो 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा आहे. यासह, 'रेड 2' आपल्या नावावर आणखी एक विक्रम करेल. मात्र, टॉम क्रूझचा बहुप्रतिक्षित चित्रपट मिशन इम्पॉसिबल 8 देखील 17 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या हॉलिवूड चित्रपटाची मोठी क्रेझ आहे, त्यामुळे 'मिशन इम्पॉसिबल 8' समोर 'रेड 2' कसा परफॉर्म करतो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.


'रेड 2' ची स्टार कास्ट


राजकुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, अमित सियाल, वाणी कपूर आणि सौरभ शुक्ला यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट 2018 मध्ये आलेल्या 'रेड' चित्रपटाचा सिक्वेल आहे.