Ragini MMS 3 cast update Junaid Khan Tamannaah Bhatia: 2011 साली 'रागिनी एमएमएस' हॉरर ड्रामा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल 'रागिनी एमएमएस 2' प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सनी लिओनी मुख्य भूमिकेत होती. सनी लिओनीचा नवा अंदाज या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मुख्य म्हणजे, 'रागिनी एमएमएस 2' या चित्रपटातून तिला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. दरम्यान, या चित्रपटाच्या संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रागिनी एमएमएस 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. परंतु, या चित्रपटात सनी लिओनी झळकणार नाही. वृत्तानुसार, तिसऱ्या भागात बॉलिवूडमधील एक नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, 'रागिनी एमएमएस 3'साठी अनेक कलाकारांशी चर्चा सुरू आहे. या चित्रपटात जुनैद खान आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची माहिती आहे. जर, असे झाले तर, तमन्ना भाटिया आणि जुनैद खान पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसतील. प्रेक्षक या जोडीला पाहण्यास खूप उत्सुक आहेत. दरम्यान, सनी लिओनी या चित्रपटात झळकणार नसल्यामुळे काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप फिल्म मेकर्सकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अधिकृत माहिती समोर आल्यानंतर या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात येईल.
'रागिनी एमएमएस 3' या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करणार असल्याची माहिती आहे. परंतु, अद्याप या चित्रपटाबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. सुरूवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शन साहिर रझा करणार होते. परंतु, वेळापत्रकातील अडचणींमुळे त्यांनी या चित्रपटासाठी नकार दिला. परिणामी, चित्रपटाचे दिग्दर्शन लांबणीवर पडत आहे. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन शंशाक घोष करतील.
हा 2011 साली प्रदर्शित झालेल्या 'रागिनी एमएमएस' चित्रपटाचा तिसरा पार्ट असणार आहे. 'रागिनी एमएमएस' हा चित्रपट दोन प्रेमींभोवती फिरते. हे कपल फार्महाऊसमध्ये जातात, त्यावेळी ते विचित्र घटनांना सामोरे जातात. 2014 साली 'रागिनी एमएमएस 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं मुख्य आकर्षण सनी लिओनी ठरली. हा चित्रपट खूप गाजला.
