Raghav Chadha BJP Entry Priyanka Chopra: सध्या देशाच्या राजकारणात (National Politics) अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यापैकी एक म्हणजे, राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा भाजप (BJP) प्रवेश. संसदेच्या दालनांपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत आणि सोशल मीडिया फिडवरही सगळीकडे फक्त आणि फक्त राघव चड्ढा यांच्याच चर्चा आहेत. राघव चढ्ढा यांनी 'आम आदमी पक्ष' (AAP) सोडून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलाय. राघव चढ्ढा यांच्या या निर्णयामुळे अनेकांना मोठा धक्का बसलाय. काहींना राघव चड्ढा यांचा हा निर्णय खटकला आहे. अशातच आता दिग्गज क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू (Navjot Kaur Sidhu) यांनी, राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. ज्यामुळे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
साधारण एका आठवड्यापासून राघव चढ्ढा सतत चर्चेत आहेत. 24 एप्रिल रोजी, राघव यांच्यासह एकूण सात राज्यसभा खासदारांनी 'आम आदमी पक्ष' (AAP) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. राघव चढ्ढा यांनी भाजपमध्ये केलेला हा पक्षप्रवेशावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक भाजपमध्ये जाण्याच्या त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर काहीजण त्यांच्याबद्दल आपली नाराजी व्यक्त करत आहेत. आता, नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी, नवज्योत कौर सिद्धू यांनी, राघव चढ्ढा यांच्या भाजपमधील प्रवेशाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
नवज्योत कौर सिद्धू राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशावर काय म्हणाल्या? (Navjot Kaur Sidhu On Raghav Chadha)
राघव चड्ढा यांच्या संदर्भात एक मोठा खुलासा समोर आला आहे. 'टॉप सिक्रेट' (Top Secret) पॉडकास्टमध्ये, नवज्योत कौर सिद्धू यांनी राघव चढ्ढा यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं खळबळजनक कारण उघड केलं आहे. त्यांनी असा दावा केलाय की, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यामुळेच राघव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय की, प्रियांका चोप्रा हिच्या हे लक्षात आलेलं की 'हे लोक' (म्हणजेच आम आदमी पक्ष) राघव चड्ढा यांना लक्ष्य करत आहेत. याचाच परिणाम म्हणून, राघव चड्ढा यांना ईडी (ED) कारवाईला सामोरं जावं लागलं असतं.
नवज्योत कौर सिद्धू यांनी पुढे बोलताना ठामपणे सांगितलं की, आपली बहीण परिणीती चोप्रा हिच्यासाठीच प्रियांका चोप्रा हिनं राघव चड्ढा यांना वाचवलं. नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीनं हे देखील नमूद केलंय की, राघव चड्ढा हे आम आदमी पक्ष सोडण्याच्या बेतात आहेत, याची त्यांना आधीच कल्पना होती. पक्षाला असं वाटू लागलं होतं की, राघव आता त्यांच्या वतीनं आवाज उठवत नाहीत. यानंतर, ते एका संघर्षात अडकले. मला हे आवर्जुन नमूद करायचं आहे की, प्रत्येक शांत व्यक्ती ही, स्वतःच्या परीनं, स्वतःच एक स्वतंत्र पक्ष असते. राघव चढ्ढा आज, चार वर्षांनंतर, आपलं म्हणणे मांडत आहेत... पण त्यांनी दीड वर्षांपूर्वीच आपल्या चिंता व्यक्त करायला हव्या होत्या. जर एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल, तर त्याच वेळी त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.
राघव चड्ढा यांनी आप सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठे बदल?
राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या त्यांच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः जेन-Z आणि काही सेलिब्रिटींनाही हा निर्णय पसंत पडलेला दिसत नाही. भाजप प्रवेशानंतर अवघ्या एका दिवसांत त्यांच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या दोन मिलियनहून अधिकांनी घटल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कुनिका सदानंद आणि अभिनेते प्रकाश राज यांनीही राघव चड्ढा यांच्या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, नवजोत कौर सिद्धू यांनी केलेल्या दाव्यांवर अद्याप प्रियंका चोपडा, परिणीती चोपडा किंवा स्वतः राघव चड्ढा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टी सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
