Tere Ishq main Trailer Launch: सोनम कपूर आणि धनुषच्या प्रमुख भूमिका असलेला "रांझणा" हा 2013 मधील चित्रपट आजही लोकांच्या मनात ताजा आहे. बनारसच्या गल्ल्यांत वाढलेलं किशोरवयीन प्रेम, त्यातील वेड, हट्ट, वेदना आणि बलिदान या सगळ्याचं सुंदर मिश्रण या चित्रपटाने दिलं होतं. 14 नोव्हेंबर रोजी ‘तेरे इश्क में’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. या कार्यक्रमाला दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्यासह कलाकार कृति सैनन आणि धनुष उपस्थित होते. ट्रेलर लाँच दरम्यान सर्वात चर्चेत असलेला प्रश्न होता ही फिल्म ‘रांझणा’ची सीक्वल आहे का?
कारण प्रेक्षकांना धनुष आणि आनंद एल. राय ही जोडी पुन्हा एकदा प्रेमकथेत पाहायला मिळाल्याने अनेकांनी असं वाटलं होतं की ‘रांझणा’ची गोष्ट कदाचित पुढे सुरू होत आहे. त्यामुळे मीडियानेही हा प्रश्न सरळ दिग्दर्शकांना विचारला. यावर आनंद एल. राय यांनी स्पष्ट उत्तर दिलंय.
काय म्हणाले आनंद एल राय?
ट्रेलर पाहून चाहत्यांना प्रश्न पडला की तेरे इश्क़ में चित्रपट रांझना चित्रपटाचा सिक़्वल आहे का? यावेळी दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी उत्तर देत संभ्रम दूर केला. त्यांनी सांगितलं,“या चित्रपटातही ‘रांझणा’सारखाच वेड आणि भावना आहेत. पण कथा पूर्णपणे नवी आहे. हो, माझा लीड हीरो पुन्हा धनुष आहे, इतकंच. याशिवाय ‘तेरे इश्क में’चा ‘रांझणा’शी काहीही संबंध नाही. हा स्वतंत्र, पूर्णपणे वेगळा चित्रपट आहे.”
धनुषच्या डेट्स मिळवणं सोपं असतं का?
प्रेस कॉन्फरन्समध्ये आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. धनुष हिंदी चित्रपट कमी करतात, तसेच ‘रांझणा’ ही त्यांची मोठी हिट असल्याने अनेकांना वाटत होतं की ते आनंद एल. राय यांना लगेच होकार देत असतील. या प्रश्नावर दिग्दर्शकांनी हसत उत्तर दिलं. “नातं जुळल्यानंतर गोष्टी सोप्या होतात. आमच्यातील प्रेम आणि बंधामुळे आता मला फार कथा सांगावी लागत नाही. पण पहिल्यांदाच जेव्हा मी आणि हिमांशु त्यांना भेटलो, तेव्हाही 10–15 मिनिटांत त्यांनी सांगितलं होतं ‘मी चित्रपट करतोय’. त्याच वेळी मला कळलं की माझ्याकडे कलाकार नाही, भाऊ येतोय.”
28 नोव्हेंबरला होणार चित्रपट प्रदर्शित
‘तेरे इश्क में’ हा चित्रपट 28 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हिमांशु शर्मा यांनी या चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले आहेत. ट्रेलरवरूनच त्यांच्या संवादांची देसी स्टाईल, दमदारपणा आणि टाळ्या-शिट्ट्या मिळवणारी मांडणी यावेळीही प्रेक्षकांना नक्कीच भावणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या चित्रपटात धनुष आणि कृति सेनन मुख्य भूमिकेत आहेत. कथा अशा प्रेमाची आहे, जे कधी एकतर्फीही वाटतं. एकाचं मन जळतं आणि दुसरं दुखावतं.ट्रेलरची सुरुवात धनुषच्या दमदार एंट्रीनं होते. तो फ्लाइट लेफ्टनंट शंकर म्हणून भारतीय हवाई दलात दाखल होतो. त्यानंतर कृति टेन्शनमध्ये बसलेली दिसते. पुढे शंकर विमान उडवताना दाखवलेला सीन लक्ष वेधून घेतो.
