Pushpa 2 Box Office Collection Day 5: अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 The Rule) हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटानं बॉक्स ऑफिस (Box Office) हादरवून सोडलं आहे. पुष्पा 2 च्या वादळानं संपूर्ण सिनेइंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर रविवारपर्यंत म्हणजे, फक्त चारच दिवसांत आपलं भांडवलं कमावलं आणि भल्या भल्या सुपरस्टार्सच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकलं. अनेक रेकॉर्डही या चित्रपटानं आपल्या नावे केले. पण, एवढे रेकॉर्ड रचणारा पुष्पा 2 ची सोमवारच्या कमाईत मात्र काहीशी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. पण असं असलं तरीदेखील पुष्पा 2 मंडे टेस्टमध्ये अव्वलच राहिला, यात काही शंका नाही.
सुमारे 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटानं यावर्षीच्या चित्रपटांचे अनेक विक्रम मोडले, मात्र सोमवारच्या कलेक्शनमध्ये काही चित्रपटांच्या तुलनेत तो मागे पडला आहे. हा चित्रपट पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारा हिट चित्रपट ठरेल अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही.
'पुष्पा 2'नं सोमवारी किती कोटींचा गल्ला जमवला?
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2: द रुल'नं पहिल्या सोमवारी 64.1 कोटींची कमाई केली आहे, ज्यामधलं सर्वाधिक कलेक्शन 47 कोटींचं हिंदीमध्ये होतं. रविवारच्या तुलनेत सोमवारी फिल्मच्या कमाईत जवळपास 54.56 टक्क्यांची घट पाहायला मिळाली. एकूण या चित्रपटानं आतापर्यंत 593.1 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'पुष्पा 2'नं जवान, पठान, अॅनिमल, आरआरआरलाही पछाडलं
सोमवारी पुष्पा 2 च्या कमाईत घट दिसत असली, तरीसुद्धा मंडे टेस्ट पुष्पानं पास केली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'पुष्पा 2: द रुल'नं यापूर्वीच्या सोमवारी बंपर कमाई करणाऱ्या जवान, पठान, अॅनिमल, आरआरआर, केजीएफ 2 यांसारख्या जवळपास सर्वच चित्रपटांना मागे टाकलं आहे.
पहिल्या सोमवारी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
- बाहुबली 2: 80.00 कोटी
- पुष्पा 2 : 64.1 कोटी
- RRR: 48.8 कोटी
- केजीएफ: चैप्टर 2: 49.15 कोटी
- एनिमल : 43.96 कोटी
- जवान : 32.92 कोटी
दरम्यान, Pushpa 2 नं आतापर्यंत सर्वाधिक कमाई हिंदीमध्ये केली आहे. आतापर्यंत पुष्पा 2 च्या एकूण कमाईपैकी 332.7 कोटी रूपये फक्त हिंदीमधून आले आहेत. तर ओरिजनल लँग्वेज तेलुगूमध्ये या चित्रपटानं आतापर्यंत 211.7 कोटींची कमाई केली आहे.
'पुष्पा 2'ची वर्ल्डवाईड कमाई किती?
या चित्रपटाच्या जगभरातील आकडेवारीवर नजर टाकली तर चित्रपटानं 870 कोटींचा आकडा गाठला आहे. 'पुष्पा 2' नं रविवारपर्यंत जगभरात 795.50 कोटी रुपयांची कमाई केली असून या चित्रपटानं जगभरात 163.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे.