Pushpa 2 Box Office Collection Day 34: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun Movie) चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 The Rule) 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) भूकंप झाला. तेव्हापासून आतापर्यंत पुष्पानं (Pushpa Movie) बॉक्स ऑफिसवरचा आपला ताबा सोडलेला नाही. पुष्पा 2 नंतर रिलीज झालेल्या अनेक चित्रपटांनाही पुष्पा 2 नं पाणी पाजलं. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केल्यानंतर महिनाभरानंतर सुकुमार दिग्दर्शित चित्रपटाच्या कमाईचा वेग आता थोडा मंदावला आहे. 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2 The Rule) नं रिलीजच्या 34 व्या दिवशी किती कलेक्शन केलं, जाणून घेऊया?
अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' या चित्रपटानं जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट भारतात सर्वाधिक कमाई करणारा पहिल्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. मात्र, जगभरातील कमाईच्या बाबतीत हा चित्रपट अजूनही या दोन चित्रपटांच्या तुलनेत मागे असल्याचं दिसून येत आहे. तो 'बाहुबली 2' (1788.06 कोटी) च्या जगभरातील कलेक्शनच्या अगदी जवळ आला आहे, तर आता 'पुष्पा 2' साठी आमिर खानच्या 'दंगल' (2070.3 कोटी) ला मागे टाकणं फार कठीण दिसत आहे.
SACNILK नं आतापर्यंत जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाची जगभरातील कमाई 32 दिवसांत 1710 कोटी रुपये झाली आहे, तर निर्माते आणि अल्लू अर्जुन यांच्या सोशल मीडिया पोस्टनुसार चित्रपटाच्या संकलनाची आकडेवारी यापेक्षा खूप जास्त आहे. अल्लू अर्जुननं एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितलं की, चित्रपटानं अवघ्या 28 दिवसांत जगभरात 1299 कोटींचा आकडा पार केला आहे. 32 दिवसांत जगभरात 1,831 कोटी रुपये कमावतील, असं निर्मात्यांनी सांगितलं आहे.
34 व्या दिवशी 'पुष्पा 2' ची कमाई किती?
Sacnilk नुसार, चित्रपटानं पाचव्या मंगळवारी म्हणजेच, 34 व्या दिवशी 2.25 कोटींची कमाई केली आहे. एकूणच, या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 1210.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'पुष्पा 2'ची जगभरातील कमाई 1712 कोटींहून अधिक
जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 34 दिवसांत 1712.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशात जवळपास 270 कोटींची कमाई केली आहे.
- 'पुष्पा 2: द रुल'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली होती.
- दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 264.8 कोटींचा गल्ला जमवला.
- तिसऱ्या आठवड्यात 'पुष्पा 2: द रुल'चा व्यवसाय 129.5 कोटी रुपयांचा होता.
- चौथ्या आठवड्यात 'पुष्पा 2: द रुल'नं 69.65 कोटींचा व्यवसाय केला.
- 30व्या दिवशी चित्रपटानं 3.75 कोटी रुपये कमावले, 31व्या दिवशी 5.5 कोटी रुपये, तर 32व्या दिवशी 7.2 कोटी रुपयांची कमाई केली.
- 33व्या दिवशी 'पुष्पा 2: द रुल'नं 2.5 कोटी रुपयांची कमाई केली होती.
- आता 'पुष्पा 2: द रुल'च्या 34व्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटानं 2.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- यासह, 34 दिवसांत 'पुष्पा 2: द रुल'ची एकूण कमाई आता 1210.95 कोटी रुपये झाली आहे.
गेम चेंजर 'पुष्पा 2'चा गेम संपवणार का?
'पुष्पा 2: द रुल' महिनाभरापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. रिलीज होऊन 34 दिवस उलटले तरीही चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. पण आता राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा गेम चेंजर 'पुष्पा 2: द रुल'ला टक्कर देण्यासाठी येत आहे. या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. असा अंदाज आहे की, गेम चेंजर रिलीज झाल्यानंतर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल'ची वाटचाल संपुष्टात येईल. आता 'गेम चेंजर' रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट किती कमाई करतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :