Continues below advertisement

Actor Pushkar Jog and Daughter Rescued Safely: मराठी मनोरंजन क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठी कलाकार पुष्कर जोग याच्या इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यानं स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. पुष्करने यासंदर्भातील व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पुष्करच्या घराचे नुकसान झाले असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाने फ्लॅटमधून अभिनेत्यासह त्याच्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं. सध्या पुष्कर जोगची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

घरात धुमसत असणारी आग विझल्यानंतर पुष्करने घराचा फोटो आणि व्हिडिओ काढला. या व्हिडिओत आगीमुळे घराचं झालेलं नुकसान स्पष्टपणे दिसत आहे. आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केलं होतं. यामुळे घराचे प्रचंड नुकसान झाले होते. पुष्करने व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यानं कॅप्शन देखील दिलं आहे. 'अग्निशमन दल, बीएमसी आणि मुंबई पोलीस या रिअल लाइफ हिरोंचे मनापासून आभार. यांच्यामुळेच आज बचावलो आहे. परंतु, घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घर संपूर्ण जळाले आहे'.

Continues below advertisement

दरम्यान, पुष्करने घराचा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी देखील शेअर केली आहे. त्यानं स्टोरीमध्ये म्हटलं की, 'माझ्या इमारतीला आग लागली. मी अडकलो आहे. प्लीज माझी कुणीतरी मदत करा. या क्षणाला मी माझ्या मुलीसोबत घराबाहेर येऊ शकत नाही. इथे सध्या सर्वत्र आग लागली आहे'. सध्या पुष्करची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चाहते तसेच नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे चिंता व्यक्त केली आहे.

पुष्करच्या इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली. याची माहिती अद्यार समोर आलेली नाही. पुष्करने व्हिडिओ शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली. व्हिडिओवर चाहते, नेटकरी तसेच कलाकारांनी कमेंट करत पुष्करची विचारपूस केली. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते तसेच अभिनेत्रींनी कमेंट करून पुष्करची विचारपूस केली. तसेच चिंता व्यक्त केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे याच्याही मुंबईतील घराला आग लागली होती. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही.