Punha Shivaji Raje Bhosale Movie Teaser : आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्रातील सिनेरसिकांना खास भेट दिली आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. महेश मांजरेकर यांनी या टीझर इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलाय.
महेश मांजरेकर काय काय म्हणाले?
इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करताना महेश मांजरेकर यांनी लिहिलं की, आषाढी एकादशीच्या पावन दिवशी…महाराष्ट्राचं आराध्य दैवत पुन्हा अवतरणार! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’या दिवाळीत साक्षी रहा इतिहासाच्या नव्या गजराला! जो मनात नवा स्वराज्याभिमान जागवणार आहे! “पुन्हा शिवाजीराजे भोसले” याजसाठी केला होता अट्टहास ...
सिनेमात शेतकरी आत्महत्येवर भाष्य
महेश मांजरेकर यांनी शेअर केलेल्या टीझरमध्ये शेतकरी आत्महत्येचा प्रश्न मांडलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे हा सिनेमा शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी निगडित आहे, असं बोललं जातंय. विशेष म्हणजे एका चिमुकलीच्या या सिनेमात खास भूमिका असल्याचं पाहायला मिळतंय. टीझरमध्ये ही चिमुकली 'राजे ओ राजे..' अशी हाक देताना दिसत आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांची घोड्यावरुन एन्ट्री प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणते. त्यानंतर शिवाजी महाराज महादेवासमोर प्रार्थना करतानाही या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. तर चिमुकलीची भूमिका साकारणार आहे, बालकलाकार त्रिशा ठोसर.... बालकलाकार त्रिशा टीझरमध्ये देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधताना पाहायला मिळत आहे.
यापूर्वी महेश मांजरेकर यांनी 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता ते दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज सध्याच्या जगात कशापद्धतीने संकटांना सामोरं जायचं? याबाबत मार्गदर्शन पाहायला मिळाले होते. आता पुन्हा शिवाजी राजे भोसले या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार? याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
4 एपिसोडवाली वेबसिरीज, गावाला वाचवण्यासाठी कुटुंबातील लोक गमावतो हिरो; थरकाप उडवणारा क्लायमॅक्स
