Project Hail Mary OTT Release: आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित 'धुरंधर' (Dhurandhar) आणि 'धुरंधर 2'नं (Dhurandhar 2) बॉक्स ऑफिस गाजवलं. इतकंच नाहीतर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुवांधार कमाई करुन फक्त बॉलिवूडच नाहीतर अख्खी सिनेइंडस्ट्री हादरवली. अनेक दिग्गजांचे सिनेमे आले आणि गेले, पण 'धुरंधर'समोर कुणाचाच निभाव लागला नाही. पण, एक सिनेमा आला आणि त्यानं 'धुरंधर'ला लोळवलं. आपल्या कमाईनं त्यानं फक्त भारतातच नाहीतर, अख्ख्या जगभरात धुवांधार कमाई केली. एवढी की, कमाईचा आकडा पाहूनच धडकी भरते.
तीन महिन्यांपूर्वी जगभरातील थिएटर्समध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक सिनेमा आला आणि त्यानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'धुरंधर'चं वर्चस्व या सिनेमानं मोडून काढलं. दमदार स्टोरी लाईन, खिळवून ठेवणारे सीन्स आणि उत्कंठा वाढवणारे ट्वीस्ट्स यामुळे या सिनेमानं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम मोडीत काढले. भारतात या सिनेमाला प्रचंड पसंती मिळाली आणि सोशल मीडियावरही याची मोठी चर्चा झाली. थिएटर्स गाजवल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. हा दमदार 'साय-फाय थ्रिलर' (Sci-Fi Thriller) सिनेमा लवकरच ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
कुठे पाहायला मिळणार? (Project Hail Mary On OTT)
आम्ही ज्या सिनेमाबाबत बोलतोय, तो सिनेमा म्हणजे, 'प्रोजेक्ट हेल मेरी' (Project Hail Mary). रायन गोसलिंगची (Ryan Gosling) मुख्य भूमिका असलेला हा साय-फाय थ्रिलर सिनेमा 20 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर थिएटर्समध्ये प्रदर्शित झालाय. त्या काळात 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) सिनेमाची प्रचंड मोठी क्रेझ असल्यानं भारतात त्याचं प्रदर्शन काहीसं लांबणीवर पडलेलं.
असं असूनही, या सिनेमानं भारतीय बॉक्स ऑफिसवर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. IMDb वर या सिनेमाला 8.2 इतकं प्रभावी रेटिंग मिळालंय, जे त्याच्या लोकप्रियतेचा पुरावा आहे. हा सिनेमा 3 जुलै 2026 पासून ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे थिएटरमध्ये हा सिनेमा पाहू शकला नसाल तर, प्रेक्षक आता घरबसल्या याचा आनंद घेऊ शकतील.
बॉक्स ऑफिसवर दमदार यश
'प्रोजेक्ट हेल मेरी' (Project Hail Mary) सिनेमा केवळ समीक्षकांच्याच नव्हे, तर बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमानं भारतात सुमारे 90 कोटी रुपयांची कमाई केलीय. त्याच वेळी, 'बॉक्स ऑफिस मोजो'च्या (Box Office Mojo) आकडेवारीनुसार, या सिनेमानं जागतिक स्तरावर 683.5 दशलक्ष डॉलर्सची कमाई केलीय. या सिनेमाची कथा एका माध्यमिक शाळेतील शिक्षकाभोवती फिरते, जो अचानक एका अंतराळयानात जागा होतो आणि आपण तिथे कसे पोहोचलो, हे त्याला आठवत नसतं. इथूनच रहस्य, अंतराळ संशोधन आणि थरार यांनी भरलेल्या एका प्रवासाची सुरुवात होते, जो प्रेक्षकांना अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
Project Hail Mary चा ट्रेलर पाहिला का?
महत्त्वाच्या इतर बातम्या :
