Bollywood Producer Struggle Life: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) नशीब आजमावण्यासाठी कित्येकजण मायानगरी मुंबईत येतात. अनेकांच्या स्वप्नांना बळ मिळतं, पण कित्येकांची स्वप्न भंगतात. कित्येकजण अखेरपर्यंत संघर्ष करत राहतात, पण, ज्यांच्या प्रयत्नांना यश मिळतं, असे काही मोजकेच लोक आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे, निर्माता रॉनी स्क्रूवाला. शाहरुख खान, सलमान खान (Salman Khan), आमिर खान (Aamir Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सर्व बॉलिवूड दिग्गज संपत्तीच्या बाबतीत या निर्मात्याच्या आसपासही नाहीत. हा निर्माता आजच्या घडीचा बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार, रॉनी स्क्रूवालाची एकूण संपत्ती 1.5 अब्ज डॉलर आहे. याबाबतीत शाहरुख खानलाही रॉनी स्क्रूवाला मागे टाकतो.
रॉनीनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका टूथब्रश उत्पादन कंपनीपासून केली आणि नंतर UTV ही निर्मिती कंपनी स्थापन केली. या बॅनरनं 'स्वदेस', 'रंग दे बसंती', 'जोधा अकबर' आणि 'अ वेन्सडे' सारखे प्रेक्षकांच्या मनात छाप सोडणारे चित्रपट तयार केले. रॉनीनं एका मुलाखतीत बोलताना खुलासा केलेला की, त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याचा व्यवसाय तीन वेळा दिवाळखोरीत निघालेला. आयुष्यातला एक काळ असा होता, जेव्हा तो त्याच्या कर्मचाऱ्यांना पैसे देऊ शकत नव्हता. तो म्हणाला की, जेव्हा तो पहिल्यांदा पैसे देऊ शकत नव्हता, तेव्हा त्याचे कर्मचारी त्याला दारू पिण्यासाठी बाहेर घेऊन जायचे. हाच त्यांचा विश्वास माझ्या यशाचा पाया बनला.
नंतर रॉनीनं त्यांची कंपनी UTV डिस्नेला 1.4 बिलियन डॉलर्समध्ये विकली आणि काही वर्षांनी आरएसव्हीपी मूव्हीजसह परत आली. या बॅनरनं लव्ह पर स्क्वेअर फूट आणि लस्ट स्टोरीज सारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. रॉनी केवळ चित्रपटांची निर्मिती करत नाही, तर तरुणांच्या प्रेरणादायी सेशन्समध्ये आणि मुलाखतींमध्येही भाग घेतो. अपयश हेच यशाचं सर्वात मोठा शिक्षक आहे, असं त्याचं मत आहे आणि प्रत्येक पडझडीनंतर उठण्याचं धाडस हे खऱ्या उद्योजकाचं वैशिष्ट्य आहे. आज, रॉनीनंतर, बॉलिवूडमधील काही श्रीमंत नावांमध्ये शाहरुख खान, करण जोहर, अमिताभ बच्चन कुटुंब, हृतिक रोशन आणि जूही चावला यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :