Priyanka Chopra white Dior gown at Oscars 2026: सध्या 98 व्या ऑस्करची चर्चा सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चित्रपटांना ऑस्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यंदाचा ऑस्कर 2026 हॉलिवूड, लॉस एंजेलिसमधील फेमस डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. 98 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात देसी गर्ल प्रियांका चोप्राचा आकर्षक अंदाज पाहायला मिळाला. ती पती निक जोनससोबत उपस्थित होती. तिचा लूक क्लासी होता. तिनं सुंदर पांढरा गाऊन घातला होता. तसेच सिंपल मेकअप लूक कॅरी केला होता. तर, निक जोनास ब्लॅक सूटवर चार्मिंग दिसत होता. सध्या दोघांचे लूक सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
प्रियांका चोप्रा या वर्षीच्य अकादमी पुरस्कार सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती. तिच्यासोबत एनी हॅथवे, रॉबर्ट डाउनी ज्युनिअर आणि ग्विनेथ पाल्ट्रोसारखे दिग्गज कलाकारही सहभागी झाले होते. यावेळी प्रियांकाचा क्लासी अंदाज पाहायला मिळाला. देसी गर्लने ऑस्कर नाईटसाठी कस्टम व्हाइट Dior गाउन घातला होता. फेदर डिटेलिंगमुळे हा गाउन तिच्यावर अजून उठून दिसत होता.
अभिनेत्रीने मोनोटोन लूकची निवड केली होती. फिटेड कॉर्सेट टॉप, थाई - हाई स्लिट स्कर्ट आणि फेदर ट्रिम्सने तिच्या लूकला अधिक ग्लॅमरस केले होते. तिनं या खास ड्रेसवर बुल्गारीचा डायमंड नेकलेस विअर केला होता. माहितीनुसार, ती या ब्रँडची अॅम्बेसेडर आहे. तिनं या लूकवर लाईट आणि सिंपल मेकअप लूक कॅरी केला होता. ओपन स्लिक हेअरस्टाइलमध्ये ती सुंदर दिसत होती.
तर, निक जोनासने व्हेलवेट ब्लॅक सूट परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते. या कपलने रेड कार्पेटवर पापाराझींवर पोज देऊन फोटो काढले. सध्या दोघांचे कपल फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. फोटोंमधून असे दिसून येते की, दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले आहेत. प्रियांकाच्या जबरदस्त लूकचे चाहत्यांनी तसेच नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. ऑस्कर नाइटमध्ये सहभागी होण्यापूर्वी निक जोनासने एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला होता. या व्हिडिओतील एक वैशिष्ट्य म्हणजे निकच्या हातावर बांधलेला पवित्र धागा. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
