Shameful Demand To Actress : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांचे कास्टिंग काउच अनुभव शेअर केले आहेत. त्याचबरोबर अनेक अभिनेत्रींनी  चित्रपटांसाठी त्यांच्याकडे करण्यात आलेल्या लाजिरवाण्या मागण्यांचाही पर्दाफाश केला आहे. अशीच एक दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री आहे जिच्याकडून चित्रपटातील गाण्यासाठी अशी लाजीरवाणी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तिने शपथ घेतली की ती त्या दिग्दर्शकासोबत कधीही काम करणार नाही.

बॉलिवूडनंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूडमध्येही आपलं टॅलेंट सिद्ध केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील देसी गर्लने हॉलिवूडमधील असंख्य चित्रपटांमध्ये काम केले. एका चित्रपटादरम्यान, दिग्दर्शकाने तिच्या स्टायलिस्टला ऑर्डर दिली होती की, गाण्यात प्रियंका चोप्राची अंतर्वस्त्रे दिसली पाहिजेत. तेव्हा प्रियांका चोप्राचं वय 19 होतं. अभिनेत्री प्रियांकाला दिग्दर्शकाची ही मागणी घृणास्पद वाटली आणि तिने चित्रपट सोडला.

प्रियांका चोप्राने फोर्ब्स वुमेन्स समिट दरम्यान दिग्दर्शकाची घाणेरडी मागणी उघड केली होती ती म्हणाली होती की 'चित्रपटात एक गाणे होते ज्यात मी एस्कॉर्टची भूमिका केली होती कारण सुंदर मुली हेच करतात. मला एस्कॉर्ट व्हायचे होते आणि या गाण्यात मला चित्रपटातील एका मुलासाठी आकर्षक दिसायचे होते. मी खूप उत्साहित होते कारण एका मोठ्या भारतीय अभिनेत्यासोबतचा हा माझा पहिला चित्रपट होता. त्यामुळे मला ही भूमिका चांगल्या पद्धतीने साकारायची होती. 

देसी गर्ल प्रियांका चोप्रा पुढे म्हणाली, 'मला ते गाणे अजूनही  आठवते. मी दिग्दर्शकाशी बोलत होते आणि म्हणाले की तू माझ्या स्टायलिस्टशी बोलशील का?  त्याला कपड्यांबाबत काय हवे आहे ते समजावून सांगशील का? मी अगदी त्याच्या मागे उभी होते. तो त्याच्या खुर्चीवर बसला होता. त्यानंतर त्याने फोन उचलला आणि म्हणाला की, जेव्हा ती तिचे अंतर्वस्त्र दाखवेल तेव्हा लोक तिला बघायला सिनेमगृहात येतील. त्यामुळे तिची अंतर्वस्त्र खूप लहान असावीत, जेणेकरून मला तिची अंतर्वस्त्र दिसावीत. समोर बसलेल्या लोकांनी तिची अंतर्वस्त्र दिसावीत असं  तो चार वेळा म्हणाला.

प्रियांका चोप्राने यावेळी सांगितले की, तिने या चित्रपटासाठी दोन दिवस शूटिंग केले होते. पण दिग्दर्शकाच्या या लाजिरवाण्या मागणीमुळे तिने चित्रपट सोडला आणि तिच्यावर प्रॉडक्शनने केलेला खर्चही परत दिला. इतकंच नाही तर त्या दिग्दर्शकासोबत पुन्हा कधीही काम करायचं नाही असंही तिने ठरवलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल; नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण