Priya Bapat Bad Experience in Hindi Movie Shooting: मनोरंजनसृष्टीत आपण अनेकदा कास्टिंग काऊचचे वाईट अनुभव ऐकतो. अनेकदा गैरवर्तवणुकीचेही प्रकार ऐकतो. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामात बरे वाईट अनुभव येताना दिसतात.  अनेक वर्षांपासून मालिका, नाटक, मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर हिंदीमध्ये सक्रिय झालेली अभिनेत्री प्रिय बापट (Priya Bapat) अशाच एका अनुभवामुळे सध्या चर्चेत आली आहे.अलीकडेच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तिने एका सहकलाकाराकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीविषयी सांगितलं. शूटिंग दरम्यान चुकीच्या पद्धतीने स्पर्श झाल्याचा अनुभव तिने सांगितला.

Continues below advertisement

प्रियाने सांगितला तो वाईट अनुभव

अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट, मालिका, वेब सिरीज मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापटने अलीकडेच दिलेला मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला वाईट अनुभव सांगितला. ती म्हणाली ' मराठीत असं कधी घडलं नाही पण माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी शूटिंग करत असताना हे घडलं. तो माझा पहिलाच हिंदी चित्रपट होता. त्या चित्रपटात फक्त एकच किसिंग सीन होता. आणि मी दिग्दर्शकाला सातत्याने विचारत होते की तुम्हाला हा सीन का हवा आहे? कारण मला त्या सीनची तिथे काहीच गरज वाटत नव्हती. पण ते खूप आग्रह करत होते म्हणून मी ठीक आहे असं म्हटलं. '

सहअभिनेता मला किस करतच राहिला..

ती पुढे म्हणाली ' मी एकाच किसिंग सीनसाठी होकार दिला होता. पण काही क्षण असे होते जिथे सहअभिनेता मला किस करतच राहिला. मला माहित नाही का पण त्यावेळी स्वतःसाठी मी ठाम भूमिका घेतली नाही. कारण मला माहीतच नव्हतं मी काय करायला हवं. आम्ही एकाच हॉटेलमध्ये होतो, पण वेगवेगळ्या रूममध्ये राहत होतो. तुम्हाला मेसेज करत होता की आपण बाहेर जाऊयात. डिनर करूयात .. तू इकडे ये, मी तुला स्विम करायला शिकवतो. आपण भेटू शकतो का? यातलं काहीच मला नको असल्याचं मी सांगितलं. असं पूर्वी कधीच माझ्यासोबत घडलं नव्हतं आणि घडूही नये.'

Continues below advertisement

त्यावेळी कसं वागाव हे मला कळलं नाही.मी भोपाळ मध्ये शूटिंग करत होते.मी उमेशला दररोज रात्री फोन करायचे. आम्ही खूप आधी हा नियम बनवला होता की आम्ही एकमेकांच्या सेटवर जाणार नाही.पण तो एकमेव सेट होता जिथे तो आलेला. मी त्याला सांगितलं नव्हतं, पण तो मुंबईहून भोपाळला आला .तीन दिवस तो माझ्यासोबत होता, जेणेकरून त्या अभिनेत्याला त्याच्या मर्यादा कळतील. "

सई ताम्हणकरला दिला सावध राहायचा सल्ला

प्रियाने हा अनुभव शेअर करताना सांगितलं ' त्याला माझ्याबरोबर अजून सिन हवे होते.सीन मध्ये जरी फक्त मिठी मारायची असेल. स्क्रीनवर ते चांगलं दिसत असलं तरी प्रत्यक्षात तुम्हाला जाणवतं की तो स्पर्श चुकीचा आहे.हे मला माहीत होतं. नंतर जेव्हा मला कळालं की सईसुद्धा त्याच्यासोबत काम करणार आहे, तेव्हा मी फोन करून तिला सावध राहायला सांगितलेलं. ' असं प्रिया बापट म्हणाली.