Priya Bapat On Horror Experience: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) सर्वात खोडकर आणि तितकीच ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे, प्रिया बापट (Priya Bapat). अनेक मराठी (Marathi Movie), हिंदी सिनेमे (Hindi Movie) आणि वेब सीरिजमध्ये (Web Series) प्रियानं दमदार भूमिका साकारल्या आहेत. तिच्या दमदार अभिनयाचं नेहमीच कौतुक होत असतं. त्यातच तिचा नवरा उमेश कामत. प्रिया आणि उमेश यांची खऱ्या आयुष्यातली जोडी, पडद्यावरही तितक्याच प्रभावीपणे वावरते आणि प्रेक्षकांना भूरळ घालते. प्रियानं नुकतीच एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीत बोलताना तिनं तिला तिच्याच राहत्या घरात आलेला एक भयावह अनुभव सांगितला आहे. 

Continues below advertisement


मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट तिचा आगामी सिनेमा 'बिन लग्नाची गोष्ट'मुळे चर्चेत आहे. तसेच, तिची काही दिवसांपूर्वी 'अंधेरा' नावाची वेब सीरिज रिलीज झाली आहे. तिनं नुकतीच दिव्या अग्रवालला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना प्रियानं अनेक गोष्टी सांगितल्या. लग्नाआधी प्रिया बापट दादरला राहायची. त्यावेळी तिला तिच्या दादरच्या घरात हादरवणारा अत्यंत भयानक अनुभव आलेला. मध्यरात्री 3-4 वाजता प्रियाला तिच्या घरात खिडकीतून कुणीतरी आल्याचा भास झाला आणि पुढे जे घडलं ते खरंच खूप हादरवणारं होतं. 


प्रिया बापटनं नेमकं काय सांगितलं? 


मराठी अभिनेत्री प्रिया बापटनं बोलताना सांगितलं की, "मी लहानाची मोठी दादरमध्ये झाले. माझ्या आईवडिलांचं घर दादरमध्ये आहे. एकदा तिथे मला खिडकीतून कोणीतरी आल्याचा भास झाला. ते फक्त पाहत होते... त्यांनी कोणाला काहीच नाही केलं... मला घुंगरांचे आवाज ऐकू आले, छन छन छन. त्याचवेळी मला त्याच्या पावलांचा आवाज येत होता...."


"मी खूप घाबरट आणि फट्टू आहे. घाबरल्यावर मी काहीही करु शकते. पण त्यावेळी मला अजिबात भिती नाही वाटली. मी शांत होते. भितीनं मी माझे डोळे उघडलेच नाही. पण कोणीतरी खिडकीतून माझ्या घरात शिरल्याचं मला जाणवत होतं. छन छन छन असा आवाज करत ते माझ्या आई-वडिलांच्या खोलीच्या दिशेनं गेलं. तो आवाज माझ्या जवळून गेल्याचं मला जाणवलं... तो तिथे गेला आणि सेटल झाला... थोड्या वेळानं तोच आवाज पुन्हा आला आणि मग सगळं शांत झालं... हे सगळं मध्यरात्री 3-4 च्या सुमारास घडलं...", असं प्रिया बापटनं सांगितलं. 


पुढे बोलताना प्रिया बापटनं सांगितलं की, "मी मला रात्री आलेला अनुभव आई-वडिलांना सांगितला. त्यांचा तिच्या सांगण्यावर अजिबात विश्वास बसला नाही. पण, तेव्हा तिचे बाबाही म्हणाले की, त्यांनाही अगदी तसंच जाणवलं. त्यांच्या बाजूला कोणीतरी येऊन बसलं आणि नंतर उठून निघून गेल्याचं जाणवलं. वडिलांना आलेला अनुभव सांगितल्यानंतर प्रिया म्हणाली की, "असं म्हणतात की, वास्तुपुरूष असतात. कोकणात हे फार सांगितलं जातं. ते खूप चांगले आत्मे असतात. तुम्ही सुरक्षित आहात ना हे पाहण्यासाठी ते येतात. ज्यांचा अध्यामावर विश्वास आहे किंवा मोठ्या शक्तींवर विश्वास आहे, त्यांना असे अनुभव बऱ्याचदा येतात..."


दरम्यान, प्रिया बापट लवकरच 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती तिचा नवरा उमेश कामतसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. प्रिया आणि उमेश यांच्याव्यतिरिक्त सिनेमात निवेदिता सराफ आणि गिरीश ओकसुद्धा दिसणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'बाहुबली'मधल्या शिवगामीला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का?