Prince Narula Fans Giving Threat To Divya Agarwal:  'द 50' (The 50) मधून बाहेर पडल्यानंतर, 'बिग बॉस OTT' (Bigg Boss OTT) सीझन 1 ची विजेती दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) मालदीवमध्ये (Maldives) सुट्टीचा आनंद घेत आहे. या काळात, एका व्हिडीओद्वारे या अभिनेत्रीनं असा खुलासा केलाय की, प्रिन्स नरुलाचे (Prince Narula) चाहते तिच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह कमेंट्स पोस्ट करत आहेत. या परिस्थितीला प्रत्युत्तर देण्यासाठी तिनं इन्स्टाग्रामचा आधार घेतला.

Continues below advertisement

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार दिव्या अग्रवालनं असा आरोप केलाय की, 'The 50' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रिन्स नरुलासोबत झालेल्या वादानंतर तिला ऑनलाईन बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत. नुकतीच या शोमधून बाहेर पडलेली दिव्या सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असून, तिनं इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. प्रिन्स नरुलाच्या चाहत्यांकडून तिला मिळत असलेल्या ऑनलाइन बलात्काराच्या धमक्यांविषयी दिव्यानं उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.

प्रिन्स नरुलाच्या चाहत्यांकडून आपल्याला शिवीगाळ करणारे मेसेज येत असल्याचं दिव्या अग्रवालनं सांगितलं. सोशल मीडियावर तिनं लिहिलंय की, "गेल्या काही काळापासून, माझ्या 'एक्स-भावा'च्या (प्रिंस नरूला) चाहत्यांकडून मला प्रचंड द्वेष आणि टीका सहन करावी लागतेय..." ट्रोलिंगबद्दल आपल्याला कोणतीही हरकत नसल्याचं तिनं स्पष्ट केलं असलं, तरी हे संदेश आता एका अत्यंत आक्षेपार्ह आणि त्रासदायक पातळीपर्यंत पोहोचले असल्याचा दावा दिव्यानं केला आहे.  

Continues below advertisement

व्हिडीओमध्ये दिव्यानं प्रिन्स नरुलावर निशाणा साधलाय. अशातच या अभिनेत्रीनं उघड केलंय की, तिला बलात्काराच्या धमक्या येत आहेत. दिव्यानं पुढे असंही सांगितलंय की, काही व्यक्तींनी तर आपल्याला तिचा पत्ता माहीत असल्याचा दावाही केला आहे. तसेच, आपल्या चाहत्यांना असे मेसेज पाठवण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोपही तिनं प्रिन्स नरुलावर केलाय. 

दिव्या अग्रवाल नेमकं काय म्हणाली? 

दिव्या अग्रवाल म्हणाली की, "अलिकडेच माझ्या 'एक्स-भावा'च्या फॅन्सकडून प्रचंड द्वेष आणि शिव्यांचा सामना करावा लागत आहे. ठीक आहे, या द्वेष चालेल, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही... पण बलात्काराच्या धमक्या?  'तू कुठे राहतेस हे आम्हाला माहीत आहे; आम्ही दहा जणांना घेऊन तिथे येऊ. आम्ही तुझ्यावर बलात्कार करू, त्याचे व्हिडीओ काढू - तू या सगळ्यालाच पात्र आहेस...' अशा प्रकारच्या कमेंट्स?"

"यातली सर्वात दुर्दैवी गोष्ट काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? हे तथाकथित 'सेलिब्रिटीज' - त्यांच्याकडे इतका फावला वेळ असतो की, शोमध्ये सहभागी झाल्यानंतरही ते पुन्हा घरी येतात आणि त्या शोचे एपिसोड्स पाहतात. ते स्वतःच्याच प्रेमात इतके बुडालेले असतात की - ते शो पाहतात आणि मग इतरांना सांगत फिरतात, 'आजचा भाग किती मजेशीर होता!' अरे मित्रा, तुझ्याकडे इतका टाइम आहे ब्रो, सीरियसली? आणि मग ते आपल्या चाहत्यांना चिथावणी देतात, जेणेकरून ते मला असे घाणेरडे मेसेज पाठवतील. म्हणजे काय - आधी लोकांना मदत करायची, त्यांना आपल्या घरात आश्रय द्यायचा; आणि मग, त्यावर असा दावा करत फिरायचं की, अरे मीच मोठं केलंय...", असं दिव्या अग्रवाल म्हणाली. 

प्रकरण नेमकं काय? 

दिव्याने खुलासा केलाय की, प्रिन्सनं एक व्हिडीओ अपलोड केल्यापासून तिला अशा कमेंट्सचा (Hateful Messages) सामना करावा लागत आहे. त्या व्हिडीओमध्ये, 'The 50' च्या घरात असताना दिव्यानं हा खेळ व्यवस्थितपणे खेळला नाही, असा आरोप प्रिन्सनं तिच्यावर केला होता. शोमध्ये असताना, दिव्यानं केवळ एकच टास्क पूर्ण केला होता, असा दावा त्यानं केलेला. तसेच, पाच एपिसोड्स (episodes) पाहिल्यानंतर दिव्या पुन्हा 'The 50' च्या घरात परतली आणि त्यानंतर तिला आपणच या गेमवर वर्चस्व गाजवतोय असं तिला वाटू लागलं. 

प्रिन्सने या गोष्टीकडेही लक्ष वेधलं की, दिव्या एकेकाळी त्याला आपला भाऊ मानत असे आणि खेळादरम्यान त्यानंच तिला संकटातून वाचवलं होतं; असं असूनही, त्यानंतर मात्र तिनं प्रतिस्पर्धी ग्रुपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. व्हिडीओच्या शेवटी त्यानं अशी टिप्पणी केली, "तुला इथेही नीट खेळता आलं नाही..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Hansika Motwani Officially Divorced From Husband Sohael Khaturiya: सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या सुखी संसाराचा 'दी एन्ड'; चारच वर्षांत मोडला संसार, कोणत्याही पोटगीशिवाय पतीपासून विभक्त