Preity Zinta : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ट्वीटरवर पोस्ट करत प्रीतीने सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर प्रश्न उपस्थित केले. "जेव्हा तुम्ही पंतप्रधानांची स्तुती करता तेव्हा लोक तुम्हाला भक्त म्हणू लागतात. तर जेव्हा तुम्ही हिंदू धर्माचा अभिमान असल्याचं सांगतात तेव्हा लोक तुम्हाला अंधभक्त म्हणू लागतात", अशा आशयाची पोस्ट अभिनेत्री प्रीती झिंटाने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे. प्रीती झिंटा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. आता सोशल मीडियावरील वाढत्या नकारात्मकतेवर त्यांनी मत व्यक्त केले. अभिनेत्रीच्या या पोस्टची बरीच चर्चा झाली आहे.
प्रीती झिंटा काय काय म्हणाली?
काही दिवसांपूर्वी प्रीती झिंटाने AI चॅटबॉटशी बातचीत केली होती. यावेळीचा अनुभव तिने शेअर केलाय. प्रीती म्हणाली, सोशल मीडियावर लोकांचे काय चालले आहे? प्रत्येकजण टीकाकार बनला आहे. जर कोणी एआय बॉटसह त्यांच्या पहिल्या चॅटबद्दल बोलत असेल, तर लोक असे मानतात की ती जाहिरात आहे. जर तुम्ही तुमच्या पंतप्रधानांचे कौतुक करत असाल तर तुम्ही भक्त आहात आणि जेव्हा तुम्ही हिंदू धर्माचा अभिमान असल्याचं सांगतात तेव्हा लोक तुम्हाला अंधभक्त म्हणू लागतात.
जीनशी लग्न का केले? प्रीती झिंटाने पोस्टमधून सांगितलं
पुढे बोलताना प्रीती म्हणाली, लोकांना ते कोण आहेत आणि ते कोण असावेत हे आपण ठरवू नये. आपण सर्वांनी शांत राहायला हवं. एकमेकांशी संवाद साधला तर आपल्या सर्वांना आनंद होईल. आता मला विचारू नका की मी जीनशी लग्न का केले? मी त्याच्याशी लग्न केले कारण माझे त्याच्यावर प्रेम आहे 💕क्युकी सरहद पर एक ऐसा शक है, जो मेरे लिए आपनी जान दे सक्ता है🤩❤️समझे 😂 टिंग!
इतर महत्त्वाच्या बातम्या