एक्स्प्लोर

Prasad Vedpathak White Line Controversy: आम्हाला सोसायटीच्या कमिटीने परमिशन दिलेय, प्रत्येक कामाला सगळ्यांना विचारत बसायचं का? सोसायटीत पांढरी पट्टी काढणाऱ्यांचा प्रसाद वेदपाठकला उलटा प्रश्न

Prasad Vedpathak White Line Controversy: आपल्या राहत्या सोसायटीत घडलेल्या एका घटनेवर प्रसादनं संताप व्यक्त करत संबंधित प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्याच्या या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

Prasad Vedpathak White Line Controversy: सध्या घाटकोपरमधल्या (Ghatkopar News) सोसायटीमधील वाद चर्चेचा विषय ठरतोय. सोशल मीडियावर या वादावरुन वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer), कंटेंट क्रिएटर (Content Creator) आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक (YouTuber Prasad Vedpathak) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलेला. प्रसाद वेदपाठकचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आपल्या राहत्या सोसायटीत घडलेल्या एका घटनेवर प्रसादनं संताप व्यक्त करत संबंधित प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्याच्या या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

प्रसाद वेदपाठकनं (Prasad Vedpathak) स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरुन आणि विविध माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवरुन आपली बाजू सर्वांसमोर मांडलेली. त्यानं अनेक दावे केले. तसेच, इन्फ्लुएन्सर असलेल्या प्रसाद वेदपाठकनं सर्वांदेखत नाजारीसुद्धा व्यक्त केलेली. पण, आता पहिल्यांदाच या प्रकरणात जी पांढरी पट्टी केंद्रस्थानी आहे, ती पांढरी पट्टी मारणाऱ्या जैन कुटुंबीयांनी (Jain Family) यावर भाष्य केलं आहे. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी 'मुंबई तक'ची टीम तिथे पोहोचली, त्यावेळी तिथे पांढरी पट्टी काढणारं जैन कुटुंबीयसुद्धा उपस्थित होतं. यावेळी दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांसमोर आपापली बाजू स्पष्टपणे मांडली. 

पांढरी पट्टी मारणाऱ्या जैन कुटुंबाचं म्हणणं नेमकं काय? 

"चातुर्मासनंतर चार महिन्यांत हा पांढऱ्या पट्टीचा रंग निघून जाईल, पुसट होईल... ", असं पांढरी पट्टी मारणाऱ्या जैन कुटुंबानं सांगितलं. 

प्रसाद वेदपाठक त्यांना म्हणाला की, "याला ट्रेडिशन बनवू नका... जर तुम्ही प्रत्येक वर्षी अशा पद्धतीनं केलं, तर मग ते योग्य ठरणार नाही... "

जैन कुटुंबानं प्रसाद वेदपाठक आणि त्याच्या कुटुंबीयांशी बोलताना सांगितलं की, "हे पहिल्यांदाच आम्ही केलंय, जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल  तर, मी पुढच्या वर्षी नाही करणार, आम्हाला कुणालाच कसलाही त्रास द्यायचा नाहीय... तुम्हीच आहात, ज्यांना त्रास होतोय, इतर कुणालाही कसलाही त्रास होत नाहीय. "

"आम्ही एकटेच नाही, इतरही आहेत... तुम्ही बोला सगळ्यांशी, मिटिंग ठेवा... मग तुम्हाला कळेल की, किती लोकांना प्रॉब्लेम आहे...", असं प्रसाद वेदपाठक म्हणाला. 

त्यावरही जैन कुटुंबीयांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले की, "प्रसाद सर, जर असं असेल ना तर, आपण सोसायटीच्या 33 मेंबर्सचं सजेशन घेऊयात, व्होटिंग घेऊयात... जर त्यात सर्वांना वाटलंच की, हे योग्य नाही, तर मग आपण ही पट्टी तात्काळ काढून टाकू..."

प्रसाद वेदपाठक म्हणतो की, "सर जर मला एकट्यालाही त्रास असेल ना, तरी मी ही पट्टी इथे राहू देणार नाही... हे मी तुम्हाला आज हात जोडून सांगतोय, मी इथे धरणं आंदोलनाला बसीन..."

"आम्हाला सोसायटी वाल्यांनी सांगितलं की, या पांढऱ्या पट्टीनं कुणालाच काहीच त्रास होणार नाही... त्यामुळे आम्ही पट्टी काढली, आता सोसायटीनंच आम्हाला परवानगी दिली, म्हटल्यावर आम्ही सर्वच्या सर्व 33 मेंबर्सकडे थोडीच परवानगी मागण्यासाठी जाणार? कमिटी आहे म्हटल्यावर कुणी कशाला घरोघरी जाऊन विचारत बसेल... आम्ही कमिटीला लेटर दिलं, कमिटीनं संमंती दिली, कमिटीनं बघायला हवं होतं, कुणाला विचारायचं, कुणाला नाही...", आपली बाजू मांडताना जैन कुटुंबानं सांगितलं. 

प्रसाद वेदपाठकची आईसुद्धा त्यावेळी तिथे उपस्थित होती. त्या म्हणाल्या की, "जर तुमचा हेतू योग्य होता ना, तर मग तुम्ही आमच्याशी प्रेमानं बोलायला हवं होतं की, तुमचा गैरसमज झालाय..."

त्यानंतर प्रसाद वेदपाठकनं पुढे येऊन सोसायटीत पांढरी पट्टी मारणाऱ्या जैन कुटुंबाला प्रश्न विचारला की, "हा निर्णय तुमचा होता की, तुमच्यावर कुणी बळजबरी केलीय?", त्यावर त्यांनी सांगितलं की, "आम्ही आमच्या जैन धर्माच्या हिशोबानं केलंय, पुढच्या वर्षी करणार नाही. आम्हाला कुणालाच त्रास द्यायचा हेतू नव्हता... आमच्या धर्मात कुणाला दुःख द्यावं, अशी शिकवणच नाहीय,आमची चांगली भावना होती आणि सगळे विचार करतील की, आमच्या बिल्डिंगमध्ये साध्वी येतील, याच हेतून केलेलं..."

प्रसाद वेदपाठकच्या पत्नीनं विचारलं की, गेल्या 25 वर्षांपासूनच साध्वी येतायत, मग ही पांढरी पट्टी आजच का? त्यावर जैन कुटुंबानं आपली बाजू मांडताना म्हटलं की, "कित्येक साध्वी इमारतीच्या गेटवरुनच निघून जात होत्या... 100 पैकी 95 साध्वी निघून जायच्या, फक्त पाचच येत होत्या..."

वाद नेमका काय?

प्रसाद वेदपाठक याच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी ही पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रसाद वेदपाठक यानं प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी आपली परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावाही प्रसाद वेदपाठक यानं केला आहे. प्रसाद वेदपाठक यानं दिलेल्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवला आहे. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही प्रसाद वेदपाठक यानं केलेली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prasad Vedpathak White Line Controversy: जैन समाजाने सोसायटीतील पांढरी पट्टी हटवली नाही तर मी त्यावरच बसून नॉन-व्हेज खाईन..."; प्रसाद वेदपाठकचा इशारा

ABP Majha च्या बातम्या LIVE:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Krushnaichya Leki Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Lockup Ram Kapoor Trolled: पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget